पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ o लो० टिळकांचे चरित्र भाग १ जोपर्यंत कायदेशीर आणि सनदशीर असतील तोंपर्यंत ती कोणीहि सभेपुढे आण- ल्यास आणि सभेने वादविवादाअंती ती ग्राह्य आहेत असे ठरविल्यास ' हा मनुष्य भयंकर आहे! हा कॉंग्रेस काबीज करील' असे म्हणणे किंवा भीति बाळगणे म्हणजे हिंदुस्थानातील हजारो शहाण्या लोकास मूर्ख ठरवून आपल्याच नेमस्तपणाचा व शहाणपणाचा टेंभा मिरवण्यासारखे आहे. ज्याना हा मार्ग स्वीकारावयाचा असेल त्यानी तो खुशाल स्वीकारावा. परंतु एवढे पक्के लक्षात ठेवावे की काँग्रेसचे याने पोषण न होता घात मात्र होईल. राष्ट्रीय पक्षास ही गोष्ट करावयाची नाही म्हणूनच त्याने खुलासेवार व मोकळेपणाने आपली काय मते आहेत ती जाहीर करून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर रीतसर कायदेशीर आणि बहुमताचा निर्बंध पाळून आपला उद्योग चालू ठेवण्याचा संकल्प मवाळास कळविला आहे. मुंबईच्या लोकास राष्ट्रीय पक्ष नको असला तरी सध्या राष्ट्रीय समेत असलेल्या सर्व हिंदुस्थानातील लोकास तो नकोसा झालेला नाही म्हणून मुंबईच्या मवाळ पुढाऱ्यानी या बाबतीत आग्रह धरू नये निदान राष्ट्रीय पक्ष सरकारला बहिष्कार टाकणारा आहे इत्यादि खोटेनाटे आरोप आणि तेहि गुप्तपणाने त्यानी करू नयेत हे चागले. तुह्माला पळवत नसले तर पळू नका पण लोकांचे पाय का ओढता ? राष्ट्रीय पक्षाचे हेतु मवाळांच्या हेतूइतकेच सद्बुद्धीचे आणि देशहिताचे आहेत हे त्यास कळू नये इतके काही ते मूर्ख नाहीत. पण भित्रेपणाने म्हणा अभिमानाने म्हणा मत्सराने म्हणा किंवा स्वतःच्या हातातच काँग्रेसचा एकमुखी रुद्राक्ष राहावा अशा बुद्धीने म्हणा किंवा अखेर या राजकीय बावतीत एकमेकात दुही झाल्यामुळे सरकारास कसे फावते हे नीट लक्षात न आल्यामुळे म्हणा राष्ट्रीय पक्षास हाणून पाडण्याचे आमच्या इलाख्यातील मवाळांचे उद्योग चालू असतात. हे उद्योग ज्या दिवशी संपतील तो सुदिन म्हणावयाचा ! ( केसरी ता. ९ फेब्रुअरी १९१५ )