पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भाग ९ शब्दांची तरी बिदागी आपणाला मिळेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. पांगारकर यानी एका आठवणीत असे लिहिले आहे की, "उत्तर हिंदुस्थानचा एक गायन शास्त्री गायनशास्त्रावर स्वतः लिहिलेला एक ग्रंथ घेऊन टिळकाकडे गेला आणि परत येऊन पांगारकराना सांगू लागला की काय या पुरुषाची बुद्धि अचाट ! टिळकाना गायनविद्या माहिती नाही असे मी तरी काही म्हणणार नाही. माझे पुस्तक चाळून पाहता पाहता व मजशी बोलता बोलता त्यानी मला गायनासंबंधी ज्या मार्मिक सूचना केल्या त्या ऐकून मी तर थक्क झालो ! या शास्त्रीबुवांच्या व टिळकांच्या भाषणात काय चर्चा झाली असेल हे सांगता येत नाही. पण शास्त्र या दृष्टीने गायनाची चर्चा झाली असली तर याहि बाबतीत टिळकानी काही सूचना केल्या असतील हे संभवनीय आहे. कारण तत्त्वग्राही मनुष्याचे मन व्यापक असते व कोणत्याहि विषयाचे त्या दृष्टीने त्याला आकलन करिता येते. टिळकानी सूचना कदाचित् ग्रंथपद्धतीच्या केल्या असतील, किंवा गायनशास्त्राला जी गणि- ताची बाजू आहे त्याहि दृष्टीने चर्चा झाली असेल. पण कोणीहि अशी खात्री देऊ शकेल की एवढा गायन शास्त्री भेटीला आला असता त्याच्या तोंडून एखादी चीज ऐकण्याची इच्छा टिळकानी खचित प्रदर्शित केली नसावी. स्वभावगुण- टिळकांचा स्वभाव निर्भय व धाडसी होता हे सर्व गोष्टीत सारखेच दिसून येईल. मग तो प्रसंग रात्री बेरात्री प्रवास करण्याचा असो, रानातून एकटे हिंडण्याचा असो, गडासारख्या बिकट जागी चढण्या उतरण्याचा असो, गर्दी मारामारीतून घुसण्याचा असो, व शेवटी प्रत्यक्ष प्रसंग आला त्याप्रमाणे युद्धाच्या काळात आगबोटीतून प्रवास करण्याचा असो. त्याना पोहण्याची कला चांगली येत असल्यामुळे वाटेल तेथे पोहावयाला पडणे हे त्याना धाडस वाटत नसे. नामजोशी व करंदीकर यानी आपल्या आठवणीत इंग्लंडच्या प्रवासाची बोटी- वरील हकीकत दिली आहे. पैकी करंदीकर लिहितात की 'बोटीवर असताना त्या दिवसात पाणसुरंग व टार्पेडो लागून बोट बुडण्याचा संभव असे म्हणून जहाजा- वरील उतारूना गळ्यात तरते पट्टे बांधून छोट्या होड्यातून उतरण्याची विद्या त्याना शिकवीत. एके दिवशी बोटीवर उतरण्याची रंगी तालीम झाली तेव्हा उभ्या दोराच्या शिडीवरून एवढ्या वयात टिळक गळ्यात पट्टा बांधून भराभ खाली उतरले आणि होडी वल्हवीत दूर जाण्याचा प्रयोग त्यानी स्वतः केलार त्यानी दोर सोडला पडाव खाली टाकला तीत उतरून तो वल्हवीत जहाजापासून दूर • गेले आणि पुनः परत येऊन बरोबरच्या लोकाकडून ती गोष्ट त्यानी करवून घेतली. ' १८९३ साली पुण्यातील दंग्याची वार्ता ऐकताच टिळक नामजोशी वगैरे मंडळीसह थेट दंग्याच्या जागी गेले. नामजोशीना मग दूरदृष्टि पौचवून टिळकाना काढून दुसरीकडे नेले. ही गोष्ट या ग्रंथाच्या पूर्वार्धात आम्ही सांगितलीच आहे. सुरतेच्या राष्ट्रीय सभेत अध्यक्षाच्या ठरावाला उपसूचना आणण्याचे ठरले तेव्हा टिळकानी ते काम मुद्दाम स्वतः कडे घेतले. खटले व तुरुंगवास