पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक १९ भूमिका घेतली होती व त्यांचे वडील पाहावयास बसले असता शेवटच्या अंका- तील पितराना तिलांजली देण्याचे काम त्यानी बेमालूम केले. त्याचप्रमाणे गोपाळ- राव आगरकरानी शेक्सपिअरच्या एका नाटकाचे भाषांतर केले असून त्या वेळच्या किर्लोस्कर मंडळीच्या हस्तपत्रकावर डॉ. गर्दे यांच्या समवेत व्यवस्थापक म्हणजे पुरस्कर्ते या नात्याने त्यांची सही असे. याच रीतीने टिळकहि तरुणपणी नाट्य- विषयाच्या गोडीतून सुटले नव्हते. पण त्यानी ती गोडी पुढे टाकून देऊन आयु- ष्याच्या शेवटल्या ३०-३५ वर्षांत नाटक पाहण्यासहि हौसेने ते कधी गेले नाहीत. गेलेच तर एखादे वेळ कोणाच्या तरी आग्रहावरून व कोणाचा तरी सन्मान करण्याला किंवा स्वतःचा सन्मान करण्याची संधि आग्रहाच्या निमंत्रणामुळे देण्याला. त्याना दूरचे थोडे कमी दिसत असे. म्हणून ते रंगभूमीकडे सारखे टक लावून बसत नसत. ही सब ठीक होतीच. पण संवाद किंवा गाणे रंगभूमीवर सुरू असता एकाग्र मनाने त्यानी ते कधी ऐकले असे नाही. रंगभूमीवर पात्रांचा संवाद सुरू असता शेजारी बसलेल्या एखाद्या स्नेह्याशी त्यांचा संवाद सुरू असे. जी गोष्ट कविता वाचनाची तीच कविता करण्याची. त्यानी विद्यार्थी दशेत संस्कृत श्लोक केल्याचे गुरुजी यानी आपल्या चरित्रात लिहिले आहे. आणि या ग्रंथाच्या पूर्वार्धात ते आम्ही उद्धृत केले आहेत. त्यानंतर प्रौढपणी त्यानी कधी कविता केल्या नाहीत. गीतारहस्याच्या शेवटी त्यानी जुन्या पद्धतीप्रमाणे आत्मनिवेदनाचे काही लोक करून घातले आहेत. आणि टिळक हट्टाला पेटते तर कविताहि करून लोकाना चकित करते यात शंका नाही. मात्र त्यांच्या कविता हल्लीच्या 'लिरिकल' पद्धतीच्या न होता जुन्या पद्धतीच्या झाल्या असत्या. नाही म्हणावयाला पुण्यास काशीनाथपंत छत्रे सरकस घेऊन आले तेव्हा त्याना कविताबद्ध मानपत्र द्यावे अशी एक टूम निघाल्यावरून गमतीने श्लोकाचा पहिला निमा भाग केळकरानी व दुसरा टिळकानी केला. इतकेच त्यांचे अलीकडचे काव्यकर्तृत्व दाखविता येईल. गाण्याची आवड त्याना नव्हती. त्यांच्या वाड्यांत मेळ्यातील पदाशिवाय एरवी कधी गाण्याचा आवाज किंवा आलाप कोणी ऐकला नाही. स्वतः ते कधीहि गुण- गुणत नसत. त्याच्या तोंडून गुणगुणण्याच्या स्वरूपाने एखादे वेळी संस्कृत श्लोकच निघावयाचा. स्वतः गुणगुणत नसल्यामुळे वाड्यांत गायनविद्येवर जवळ जवळ बहिष्कार असे. एखाद्या लग्नसमारंभात सनईवाला चांगले वाजवीत असला तर लोकानी त्याचे कौतुक करावे, पण स्वतः यजमान रामोर बसून आनंदाने कधी वाजवून घेतील असे मुळीच घडावयाचे नाही. पंक्तीतून कोणी लोक म्हटला तर सीताकान्त म्हणून म्हणून मंडळी ओरडतील त्यांत मात्र ते सामील व्हावयाचे ! वाड्यातील गणपती उत्सवात केव्हा बालगंधर्व किंवा भास्करबुवा अशा गवयाना चालकानी पाचारण करावे. पण यजमानाने स्वतः बसून स्वस्थपणे एक दोन चिजा ऐकल्या असे कधी घडले नाही. आणि टिळकांच्या घरी जाऊन आपण गायलो व टिळक हजर होते हाच त्याना बहुमान वाटे, गुणग्राहक