पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ प्रथम देश तयार करणार काँग्रेसमध्ये शिरणार व काँग्रेस काबीज करणार आहे. " हे ऐकून खाडिलकर लवाटे वगैरे मंडळी आश्चर्यचकित झाली. त्याना वाटले की टिळकानी इतके स्पष्टपणे बोलावयास नको होते. होणे जाणे पुढेच आहे. मग अशी धमकी का ? ते पाहून टिळक म्हणाले “पूर्ण विचारांती जी माझी ठाम मत झाले असतात ती मी प्रतिपक्षाला नेहमी उघड व प्रथमच बजावीत असतो. आपले धोरण प्रतिपक्षाला उघड करून त्याच्याशी दोन हात करण्यातच पुरुषार्थ आहे असे मला वाटते. " कलापैकी टिळकाना वास्तविक कोणत्यादि एखाद्या कलेचा नाद तर नव्ह- ताच पण मनातून अभिरुचिहि नव्हती. वेळ नाही म्हणून व्यासंग नसेल. अधिक महत्त्वाची दुसरी कामे म्हणून कोणत्याहि कलेकडे ते लक्ष देत नसतील. पण कोणत्याहि कलेत त्याना खरी करमणूक अशी वाटत नसावी. मराठी किंवा इंग्रजी किंवा संस्कृत काव्य घेऊन ते ते कधी वाचीत बसले असे सहसा कोणा- सहि आढळले नाही. आणि भारत हे जरी श्लोकबद्ध असले तरी ते काव्य म्हणून टिळक बाचीत नसत. संस्कृतातील कोणतेहि शास्त्र श्लोकबद्धच लिहिलेले असते. त्यात काही विशेष नाही. चित्रकलेचेहि तसेच. त्यानी एखादे चित्र चांगलें म्हणून घरात लावून ठेवले असे झाले नाही. त्यांच्या घरी पाहिले तरी त्यांचा व त्यांच्या बरोबर इतर मंडळीचा काढविलेला व त्याना नजर केलेला फोटो भिंती- वर आढळावयाचा. स्वतः टिळकांचा एक फोटो फ्रेमत घालून त्याना नजर केलेला त्यांच्या टेबलावर पाहून गांधी यानी नाक मुरडले असा एक प्रवाद आहे. पण ते टेबलावर किंवा भिंतीवर स्वतः आपला फोटो किंवा इतरांचाहि मुद्दाम लावीत नसत. स्वतः देखणे असे मानून आपला फोटो त्यानी आपल्या टेबलावर ठेऊन दिला हे म्हणणे जितके खोटे तितकेच अहंकार बुद्धीमुळे तो त्यानी ठेऊन दिला हेहि म्हणणे खोटे आहे. आम्ही वर सांगितल्याप्रमाणे कोणीतरी नजर केलेला फोटो तेथे ठेवलेला असेल व गांधी येण्याला व तो फोटो तेथे असण्याला एक गाठ पडली असेल याहून दुसरा संभव वाटत नाही. टिळकांमध्ये अहंकारवृत्ति नव्हती असे आमचे म्हणणे नाही. पण स्वतःचा फोटो टेबलावर ठेऊन त्याकडे पाहात बसण्याइतकी ती ग्राम्य नव्हती इतकेच म्हणावयाचे. नाट्यकलेची हीच गोष्ट. ते आपल्या इच्छेने कधी नाटक पाहावयास गेले नाहीत. कॉलेजांत व कॉले- जातून बाहेर पडल्यावर आर्यक्रीडेोद्धारक नामक खाजगी नाटक मंडळीचे खेळ पुण्यास चालू असता तिच्या हँडबिलावर टिळक सही घालीत, व तरुण मुलाच्या हौसने हे खेळ चालू असता पडद्यामागे उभे राहून पडदे ओढविण्याचे व सरक- विण्याचे काम त्यानी केले असे सांगतात. पण ही कंपनी धंदेवाईक नव्हती, ती हौशी सम्यगृहस्थांची होती. तीत शंकरराव पाटकर गोविंदराव देवल इत्यादि गृहस्थ केवळ नाट्यकलेच्या आनंदाखातर व उद्धारार्थ स्वतः पार्ट करीत. स्वतः विष्णुशास्त्री चिपळूणकर यानी कॉलेजच्या दिवसात वेणीसंहार नाटकात धर्माची