पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ करा. व्यक्तिविषयक १७ पुरास कशाला जाता ? यावर्षी जुलै अखेरला टिळक मरणार आहेत ! पण गेलाच तर तुम्ही सोलापुरास गेल्यानंतर शनीची काही तरी आराधना करण्याची खटपट " गाडी गोकाक रोड स्टेशनवर आल्यावर गंगाधरराव देशपांडे हे मी ज्या डब्यात बसलो होतो त्या डब्यात आले व कुळकर्णी यानी सांगितलेली हकीकत त्यानी मला सांगितली. मी म्हणालो " त्याचे काय ऐकता ? तो तंबाकूच्या तारेत असेल ! " परंतु दुसऱ्या दिवशी सोलापुरास गेल्यानंतर माझी व श्री. तात्या- साहेब केळकर यांची गाठ पडली त्यावेळी मी ती गोष्ट केळकराना सांगितली. तसेच दुसरे दिवशी बेळगावची मंडळी पुणे स्टेशनवर उतरताच ही गोष्ट त्या सर्व मंडळीनाहि कळली. पुढे जुलैच्या ३१ तारखेस मी मुंबई कौन्सिलच्या बैठ- कीला हजर राहण्याकरिता बेळगावाहून निघालो. त्या दिवशी शनिवार होता. दुसरे दिवशी म्हणजे रविवारी तारिख १ ऑगस्ट रोजी मी पुणे स्टेशनवर आलो तेव्हा आदले दिवशी रात्री १२ चे सुमाराला टिळक वारल्याचे मला समजले. पुढे एक तासाचे आतच कुळकर्णी यांची व माझी गाठ पडली. त्यावेळी कुळ- कर्णी हे पुणे कोटीत डिस्ट्रिक्ट जजाचे पर्सनल असिस्टंट होते. मी कुळकर्णी यांच्या घरी गेल्याबरोबर त्यानी मला विचारले की " का ? मी सांगितलेली गोष्ट खरी झाली की नाही ? " रात्री टिळक मरणार ही गोष्ट मी ह्या घरी राहणाऱ्या एका म्हातारीला काल सांगितली होती. " ह्या गोष्टीची खात्री करण्याकरिता त्यानी म्हातारीलाहि बोलावून आणले व मोघम विचारले "मी टिळकाविययी तुम्हाला काल काय सांगितले होते ? " ती बाई म्हणाली " आज रात्री टिळक मरणार असे तुम्ही मला सांगितले. " कुळकर्णी यानी लो. टिळकांची जन्मतिथि व कुंडली आपल्या डायरीत टिपून ठेविली होती ती मला त्यानी दाखविली, व म्हणाले की “टिळक आधीच ३ दिवसापूर्वी मरणार होते परंतु त्यावेळी चंद्रग्रह अनुकूल होता, व आज पहाटे चंद्रग्रह प्रतिकूल होणार तेव्हा टिळक रात्री मरणार अशी माझी खात्री झाली. " १ अंतरंग व कलाभिरुचि - टिळकांचे अंतरंग जरी उथळ नव्हते व कित्येक बाबतीत त्याचा निकट परिचितानाहि सहसा थांग लागत नसे तरी संभाषणाच्या किंवा वादाच्या भरात आले असता टिळक अपेक्षेपेक्षाहि स्पष्टपणे बोलून जात. याचे एकच उदाहरण दिले असता पुरे होईल. केतकर आपल्या आठवणीत असे लिहितात की सन १९१४ साली काँग्रेसच्या पूर्वी काँग्रेसचा वाद चालू असता गोखले हे टिळकाना परत भेट देण्याकरिता वाड्यांत आले. दोघे दोघेच मॅनेजरच्या खोलीत बसून बोलले. गोखले गेल्यावर टिळक माडीवर आले तेव्हा खाडिलकरानी टिळकाना विचारले गोखले काय म्हणतात १ टिळक म्हणाले " गोखले म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका. आजच्या काँग्रेसमधील मंडळीचे व तुमचे पटणार नाही. त्यावर मी उत्तर दिले. काँग्रेस सर्वांचीच आहे. ती काही कोणत्यादि एखाद्या पक्षाला आंदण दिलेली नाही. मी