पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ बांधण्याला ज्ञात गोष्टींचा जितका दीर्घ व विविध अनुभव लागतो तितका अनुभव ज्योतिषशास्त्रात मिळालेला नाही असेहि त्याना वाटे. ग्रहांच्या गति गणकज्योतिषी व फलज्योतिषी याना सारख्याच आधारभूत होत. तथापि त्या गतीनी येणाऱ्या ग्रहांच्या त्या त्या स्थानापासून फल काय मिळते याविषयी त्यांचे मत निःसंदेह नव्हते. टिळक हे निरयन पंचांग पद्धतीचे अभिमानी होते. पण त्याचे कारण ते भारतीय फलज्योतिषाचे अभिमानी होते हे नव्हे, तर भारतीय परंपरागत ज्योतिर्गणितपद्धतीचे अभिमानी होते हेच होय. जुने ठेवावे पण ते वाढवावे व सुधारावे याच दृष्टीने त्यानी पंचांगशोधनाची चळवळ केली. फलज्योतिषावर टिळकांचा विश्वास फारसा नव्हता व हस्तमुद्रा - शात्र मस्तिष्कशास्त्र यांवरहि विश्वास तितकाच होता. तथापि या दोन्ही तिन्ही शास्त्राच्या काही अनुभवसिद्ध असे सिद्धान्त असावे व कदाचित् काही नियमहि बसवता मुळाशी येणे शक्य आहे ही गोष्ट टिळकानी या शास्त्रात वावरणाऱ्या कित्येक लोकाना दिलेल्या सर्टिफिकिटावरून दिसून येते. टिळकांसंबंधाने भविष्ये वर्तवण्याची पुष्कळ लोकांची उडी. पण ती साधली असे फार थोडे, ती फसली असेच पुष्कळ. तथापि अपवादादाखल दोन गोष्टींचा उल्लेख करण्याला आनंद वाटतो. १९०८ सालचा टिळकांचा खटला सुरू असता एका गृहस्थाने खटला संपण्याचे आधी थोडे दिवस, आणि खटला केव्हा संपेल याचा अंदाज नाही अशा स्थितीत, तो अमुक दिवशी अवेळी रात्री संपेल व शिक्षा होईल असे लिहून पाठविल्याचे आम्हाला स्मरते. इतर अदमासावरून हे भविष्य खोटे ठरणार असेच प्रथम वाटले. पण ते खोटे ठरण्या- ऐवजी खटल्याच्या कालक्रमातच अभावित रीतीने फरक झाला आणि भविष्य किंचित् फरकाने पण जुळले, भविष्य खरे ठरल्याची दुसरी गोष्ट श्री, दत्तात्रय व्यंकटेश बेळवी बेळगाव यानी स्वतः अनुभविली तिची हकीकत त्यानीच आपल्या हाताने आम्हाला लिहून दिली ती जशीच्या तशी खाली देत आहे. " सन १९२० साली एप्रिल महिन्यात सोलापुरास मुंबई प्रांतिक परिषदेची बैठक होणार होती. त्यावेळी बेळगावाहून परिषदेला जाण्याकरिता आम्ही सुमारे ३० मंडळी निघून सायंकाळी ५ वाजता बेळगाव स्टेशनवर आलो. स्टेशनवर धारवाडकडून मेल गाडी आली. या गाडीत आमचे एक स्नेही रा. . काशीनाथ गुरुनाथ कुळकर्णी बी. ए. एल्एल्. बी. हे होते. त्यानी मला व गंगाधरराव देशपांडे याना स्टेशनवर पाहिले तेव्हा आपल्या डब्यात येऊन बसण्या- बद्दल सांगितले. परंतु मी त्यांच्या डब्यात गेलो नाही. फक्त गंगाधरराव देशपांडे एकटेच गेले. गाडी सुरू झाल्यावर कुळकर्णी व गंगाधरराव देशपांडे यांचेमध्ये संभाषण झाले त्यात कुळकर्णी यानी गंगाधररावाना विचारले की, " इतकी मंडळी कोठे निघाली आहे " ? गंगाधररावानी सोलापुरास जाण्याचा उद्देश कळविला व सोलापुरास परिषदेकरिता लो. टिळक येणार आहेत असे सांगितले. तेव्हा कुळकर्णी यानी गंगाधररावाना ताबडतोब असे म्हटले की, “तुम्ही सोला-