पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक १५ वचने आढळण्यासारखी असली तरी तो संत कवि एकंदरीने निवळ निवृत्तीपर व भक्तिमार्गाकडे लक्ष देत होता असा तुकारामासंबंधाने त्यांचा ग्रह असे. संतसांप्रदायाचा धि:कार त्यानी रागाच्या भाषेने कधी न केला तरी, भाविक जनता त्याना वंदन करिते म्हणून आपणहि त्याना वंदन करावे अशी त्यांची वृत्ति असे. तोंडावरील आंकडे व अक्षरे पुसून गेली असली तरी मैलाचे दगड हे जसे कोणी उपटून टाकीत नाही, मार्गदर्शक म्हणून ते उरू देतात, त्याप्रमाणे असंस्कृत व अतत्वज्ञानी जनतेच्या धार्मिक समाधानाचे ते एक साधन म्हणून संतसांप्रदाय उरू द्यावे आणि आपणहि त्याना सभ्यतेने वागवावे असे टिळकाना वाटे. संस्कृत शास्त्रीय ग्रंथ वाचून उरण्याइतका त्यांच्याजवळ वेळ नव्हता, आणि प्राकृत ग्रंथ वाचल्याशिवाय जनतेला बोधप्रद किंवा समर्पक उपदेश करण्याचे त्यांचे काम अडले नव्हते. इंग्रजी भाषेतील ग्रंथासंबंधानेहि हाच विवेक व हीच आवडनावड. त्यानी त्या भाषेतील काव्य नाटके कादंबऱ्या वाचल्या नाहीत. हे अर्थातच दूषण होऊ शकत नाहीत. पण इतिहास अयहि त्यानी फारसे वाचले नव्हते. म्हणजे इतिहासासारख्या विषयावर लिहिताना त्यांचे दाखले फक्त भारत वगैरे ग्रंथातून येत. जुन्या ग्रीक रोमन किंवा आधुनिक इंग्रजी इतिहासातून सहसा येत नसत. टिळक व ज्योतिष - टिळकाना ज्योतिषाची आवड होती. पण ती ज्योतिर्गणि- ताची. फलज्योतिषाची नव्हे. स्वभावाने उद्योगवादी असल्यामुळे त्यानी कुंडल्या मांडून प्रश्न पाहण्याची, वर्षफलांची भेंडोळी चाळण्याची, किंवा ग्रहस्थिति पाहण्याक- रिता पंचांग उघडण्याची तसदी घेतली नाही. तात्त्विक दृष्ट्या फलज्योतिष हेहि एक शास्त्र असावे असे त्याना वाटे. पण त्याचे नियम अद्यापि बनावे तसे बनलेले नाहीत आणि गृहीत गोष्टी पुष्कळशा चुकलेल्या असतात यामुळे नियम बरोबर असले तरी अनुमाने बरोबर येतीलच असे त्याना वाटत नसे. महाडकर व इतर काही ज्योतिषी यांच्या परिचयाने त्याना असे दिसून आले होते की, शरीराच्या काही लक्षणावरून जन्मकाळच्या काही ग्रहांच्या स्थितीचा अंदाज करिता येतो. पण ही विद्या त्यानी, महाडकर हे त्यांचे परम स्नेही असताहि, त्यांच्यापासून शिकून घेतली नव्हती. यावरून या विद्येने त्याना मोहून टाकले नव्हते इतके खचित ठरते. वास्तविक ज्या बुद्धीला हजारो वर्षापूर्वीच्या जुन्या काळातल्या अज्ञात गोष्टी- विषयी अनुमाने बांधण्याची आवड व हौस तिला तीच आवड व तीच हौस पुढे येणाऱ्या काळातील गोष्टीविषयीची अनुमाने बांधण्याविषयीहि असावी हे स्वाभाविक वाटते. कारण ज्याला आपण भविष्य म्हणतो ते झाले तरी काय आहे ? ज्ञातावरून अज्ञाताचे अनुमानच होय. पण टिळकाना ती आवड व हौस नव्हती यात शंका नाही. केवळ मिथ्यावादी अज्ञानी अशा अनेक ज्योतिषाशी नेहमी गांठ पडे यामुळेच त्यांची ही अश्रद्धा झाली होती असे मात्र नव्हे. तर ऐति- हासिक वाङ्मयात्मक संशोधनातील ज्ञात गोष्टी व फलज्योतिषातील ज्ञात गोष्टी यांच्या स्वरूपात फरक आहे असे टिळकांचे मत होते, तसेच अबाधित नियम