पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ एकाद्या गाठाळ लाकडाच्या ओंड्याप्रमाणे दिसे. पण ते भरीव व जोरकस आहे असा अदमास डोळ्याना किंवा कानाना सहज करता येई. इंग्रजीत बोलावयाचे असता इतर कित्येक प्रसिद्ध वक्त्याप्रमाणे टिळक बिनचुक साफ किंवा अस्खलित बोलू शकत नसत. पण मुख्य मुद्याला एकदम हात घालून रंध्याने लाकडाची बारीक साल काढावी त्याप्रमाणे कोणच्याहि विषयाचे पृथ:करण करून त्यातील सूक्ष्म विचाराचे पापुद्रे सोलून दाखविणे या कामी टिळकांचा हातखंडा होता त्या कामात परक्या इंग्रजी भाषेनेहि त्याना कधी दगा दिला नाही. आणि मराठी मायभाषेत तर त्यानी सर्व प्रकारे प्रभुत्व संपादले होते याविषयी वादच नाही. असे करूनहि टिळकाना वाङ्मयाची गोडी देता घेता आली नसती असा अर्थ नाही. पण अर्थसौंदर्यापेक्षा शब्दाच्या किंवा विवेचनाच्या परिणामकर्तृत्वाकडेच त्यांची दृष्टि अधिक असे. त्यानी मंडाले येथे तुरुंगात असता जी पुस्तके आपल्या भोवती जमविली त्यांवरूनहि त्यांची विद्याविषयक अभिरुचीची दिशा दिसून येते. त्या शेकडो ग्रंथात, निव्वळ वाङ्मयात्मक किंवा उच्च प्रतीचे का होईना पण, मनाला करमणुकीचे असे बहुधा एकहि पुस्तक आढळणार नाही. आणि तुरुंगातील ही आवड देखील केवळ वर्ष सहा महिन्यांची नव्हती. गीतारहस्य लिहून झाल्यानंतर व आधी त्याना मोकळा असा बराच वेळ होता. परंतु अशा मोकळ्या वेळातहि स्यांची करमणुकीची साधने म्हटली म्हणजे तत्त्वज्ञानाचे किंवा शास्त्रीय ग्रंथ हेच होत. संस्कृत वाङ्मयाचे त्यांचे इतके तरी वाचन होते. पण मराठी वाङ्म याचे वाचन फारच थोडे होते म्हटले तरी चालेल. गीतारहस्यामध्ये जरी दास- बोध तुकाराम किंवा ज्ञानेश्वरी यातील अवतरणे आली असली तरी यापैकी कोणत्याहि ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास त्यानी केला नव्हता. याचे पहिले कारण हे की प्राकृत टीकाकार पदरचे असे तत्वज्ञान काही सांगत नाहीत, म्हणून उसन्या - तून उसने घेण्यापेक्षा काय घ्यावयाचे ते मुळातून घेतलेले बरे असे टिळकाना वाटे, रामदासाच्या प्रवृत्तिपर धोरणाचे टिळक जितके कौतुक करीत तितके त्यांच्या पद्यात्मक दासबोधाचे ते करीत नसत. समर्थाकडे ते कवि या दृष्टीने नाहीच पण साधुपेक्षाहि धर्माभिमानी मुत्सद्दी या दृष्टीने अधिक पाहात. आणि ज्याला स्वतः वाङ्मयातील अंलकाराची आवड नाही तो ज्ञानेश्वरी हे गीताभाष्य असले तरी त्याच्याकडे बारकाईने कशाला पाहील १ जुन्या संस्कृत पंडितांचा प्राकृ- ताविषयीचा जो अनादर तोच टिळकानी थोडासा उचलेला होता असे म्हणावेसे वाटते. ते राजकारणात पडले व वर्तमानपत्रकार बनले म्हणूनच त्यानी मराठी भाषेत लिहिले. पण त्यांच्या मूळ कल्पनेप्रमाणे ते निवळ प्रोफेसर होऊन राहते तर काही ग्रंथ त्यानी इंग्रजीत व कदाचित् एखादा दुसरा संस्कृता- तद्दि लिहिला असता. तुकारामाचा एखादा अभंग त्यांच्या तोंडून यह- च्छेने निघाला असे संबंध २०-३५ वर्षांत कोणी पाहिले नसेल. याचे कारण, तुकारामाच्या ग्रंथांत समर्पक किंवा चाबूक उडल्याप्रमाणे कडकडीत अभंग