पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ९ व्यक्तिविषयक ११ शास्त्र ग्रंथावरून तयार केलेला युक्तिवाद मी व नानासाहेब पेंडसे यानी खालच्या कोर्टात समजावून सांगितला व नंतर हायकोर्टात चंदावरकर यानाहि समजावून दिला. कारण चंदावरकर हे जरी कायदेपंडित असले तरी मिताक्षरा ग्रंथांतील मर्म समजावून घेऊन त्यावरून युक्तिवाद करण्याइतके संस्कृताचे ज्ञान त्यांना नव्हते. शेवटी टिळकांनी सुचवून दिलेल्या युक्तिवादाप्रमाणे चंदावरकर यांनी हायकोर्टापुढे तक्रार सांगितली व ती यशस्वी ठरली. पाटणकर म्हणतात " टिळ कानी तयार केलेले आर्ग्युमेंट धर्मशास्त्र ग्रंथाचा अर्थ बरोबर लावून शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले पाहून त्यावरून त्यांची बुद्धि व विद्वत्ता याबद्दलचा माझा आदर दुणावला. " कोणत्याहि कामात कायद्याच्या शब्दाचा अर्थ हा कोणालाहि फार मोठा आधार. व तो आधार टाकून देऊन नुसत्या तार्किक पद्धतीने जाऊन न्याय- कोर्टात काय किंवा राजकारणात काही चालावयाचे नाही ही गोष्ट टिळकांच्या मनात नेहमी बिंबलेली असे. राणीच्या जाहीरनाम्याची खरी किंमत किती हे त्याना माहीत नव्हते असे नाही. आणि कर्झनसाहेबानी अशक्य सनद म्हटले त्याचे मर्म टिळकाना कळत नव्हते असे नाही. पण संनदेचा शब्द हा कोणत्याहि हक्काचा मोठा व पहिल्या प्रतीचा आधार, आणि तो थोडासा असला तरी खंबीर म्हणून त्याच्यावर केवढीहि इमारत रचता येते. असा तो आधार काढून घेतला याबद्दल टिळकाना लॉर्ड कर्झन यांचा जितका राग आला तितका केवळ बंगा- लच्या फाळणीच्या कृत्यापासूनहि आला नाही. टिळक अराजक नव्हते हे पूर्वी एका अर्थाने सांगितलेच आहे. पण त्याहून विशेष अर्थाने ते सांगावयाचे म्हणजे असे की, कायदा करण्याचा अधिकार कोणाला असावा हा प्रश्न सोडून दिला असता, कायदा म्हणून प्रत्येक गोष्टीला असलाच पाहिजे व जेथे व्यवस्था नाही तेथे प्रगति नाही व पराक्रम नाही असे त्यांचे ठाम मत असे. वाङ्मयाभिरुचि - संस्कृत ग्रंथांचा अभ्यास टिळकांचा विशेष पण त्यातल्यात्यात तो शास्त्रीय ग्रंथांचा असे. कॉलेजमध्ये त्यानी बी. ए. च्या परीक्षेकरिता ऐच्छिक विषय गणित हा घेतला होता. यामुळे संस्कृत ग्रंथाचे कॉलेजातील त्यांचे वाचन फार थोडे असले पाहिजे. तथापि कॉलेजमधून बाहेर पडल्यावर फावलेल्या वेळी त्यानी शास्त्रीय ग्रंथ टीकाग्रंथ सूत्रग्रंथ भाष्यग्रंथ कारणपरत्वे वाचले. आणि तेहि कोणा शास्त्र्याच्या मदतीने नव्हे तर स्वतःच्या प्रयत्नाने. पण अशा ग्रंथाचे त्यांचे ज्ञान व उपस्थिति वाला- णण्यासारखी असे. भिडेशास्त्री आपल्या एका आठवणीत लिहितात की " एकदा ' शारीर ' हा शब्द वेदातसूत्रात कोठे आला आहे असा प्रश्न निघाला तेव्हा माझ्यात व टिळकात मतभेद झाला. पण लगेच टिळकानी कपाटातून पुस्तके " वास्तविक काढून संदर्भ शोधून पाहिला तो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आढळला. शास्त्रीबुवाना या बाबतीत आपणाकडे कमीपणा घेण्याचे कारण नव्हते. ते अंध टि० उ...४६