पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचें चरित्र भाग ९ " आणारे बाबा निळी काळी व तांबडी ! ह्याशिवाय आता काही भागत नाहीसे झाले आहे. " पण एकंदरीने पाहता त्यांचा विश्वास खुणापेक्षा आपल्या स्मरण- शक्तीवरच अधिक असे. आणि खुणा केलेले आधार लोक जितक्या त्वरित काढून देत तितके हे आपल्या स्मरणाने काढीत असा पुष्कळांना अनुभव आलेला आहे. स्मरणशक्ति सारखीच टिळकांची ग्रहणशक्तिहि विशेष त्वरित असे. पुस्तक वाचण्याची त्यांची पद्धति इतराहून भिन्न असे. म्हणजे हाती पुस्तक पड- ताच ते त्याचे आद्यन्त पाहात. नंतर मधली काही पाने चाळीत. नंतर प्रकरणाचे मथळे पाहून ग्रंथकाराने ग्रंथसंगती कशी काय बसविली आहे हे पाहात. पण आदिपासून इतिपर्यंत सगळे पुस्तक तर राहोच पण एखादा सगळा भागहि एखाद्या पुस्तकांतील त्यानी प्रथम वाचला असेल असे वाटत नाही. वैदिक विषयासारखा किचकट विषय असेल किंवा जेथे शब्द अपरिचित म्हणून स्पष्ट व सुवाच्य लिहिण्याचे महत्त्व असेल किंवा जेथे शब्दप्रयोग क्लिष्ट असून साधार- णपणे स्मरणात राहण्यासारखा नसेल तेथे मात्र ते टिपणबुकेहि करीत व मधून मधून टिपणे लिहून ठेवीत. पण इंग्रजी ग्रंथापेक्षा संस्कृत ग्रंथाचीच टिपणे अधिक आढळत. लोकमान्यांच्या चिरंजीवानी अलिकडे एक पुस्तक छापले आहे. त्यात टिळकांची काही टिपणे दिलेली आहेत. ती पाहिली म्हणजे अवतरणे उतरून घ्यावयाची झाली तरी किती सूत्ररूपाने उतरून घेत हे दिसून येते. ग्रंथसंग्रह - टिळकांचा ग्रंथसंग्रह कोणी पाहिला तर त्यात संस्कृत विद्येच्या खालोखाल कायद्याची पुस्तके अधिक आढळतील. देशमुख यांच्या ग्रंथसंग्रहातील जुनी कायद्याची पुस्तके टिळकाकडे आली होती. तथापि नवी पुस्तकेहि ते केव्हा केव्हा घेत. एखाद्या स्वतंत्र विषयावरील पुस्तकापेक्षा न्यायकोर्टाच्या निवाड्यावरील पुस्तके ते अधिक चहात. व्यक्तिशः टीकाकाराच्या मताला ते किंमत देत नसत. पण न्यायकोर्टाचे निवाडे हे अंतिम स्वरूपात जरी व्यक्तीचे मत असले तरी त्याला कायद्याचे स्वरूप आहे या गोष्टीला ते महत्त्व देत. एखाद्या धंदेवाईक वकीलाप्र- माणे लॉ जर्नल इंडियन लॉ रिपोर्टर यासारख्या क्रमिक मासिक पुस्तकांची ते वर्गणी भरीत. वर्षाअखेर यांची पुस्तके बांधली गेली की नाही व अनुक्रमाने ती एकापुढे एक लावून ठेवली गेली की नाही हेहि ते मोठ्या आस्थेने पाहात. कारणपरत्वे ही न्याय निवाड्याची पुस्तके ते मधून मधून चाळीतहि यामुळे अगदी थेट धंदेवाईक वकीलाइतके नसले तरी सामान्य वकीलाइतकी त्याना चालू निवाड्यांची उपस्थिति असे. मुद्दाम एखादा आधार पाहावयाचा झाला तर ते डायजेस्टाचे खंड तासानतास चाळीत बसत. धंदेवाईक नसलेतरी टिळक हे कायदे पंडितच होते. याबाबतीत नाशिकचे त्यांचे शिष्य नीलकंठराव पाटणकर लिहितात की हिंदुधर्मशास्त्रातील वारसाईच्या हक्काचा प्रश्न विंचुरकर घराण्याच्या मिळकती संबंधाने निघाला. या मुकदम्यात टिळकानी बाळासाहेब विंचुरकर यांच्या बाजूने लक्ष घातले होते. आणि त्यांनी