पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक राग ते, तें अन्न कमी खाऊनच त्यावर एखादे वेळी काढीत. पुढे पुढे सात्त्विक अन बरेच कमी झाले तेव्हा अंगच्या व्याधीला धरून त्याना कोणी बदाम खाण्याला सांगितले होते. त्याप्रमाणे बदाम कुटून त्यांचा केलेला लहानसा लाडु ते सकाळी चहाच्या पूर्वी खात. टिळकांचा आहार सामान्यतः कमीच असे. आणि पंक्तीत कोणी आग्रह केला तरी ते त्याला बळी पडत नसत. त्याना आवड म्हणून मुख्यतः थंड पदार्थांची. गार पाणी बर्फ घातलेले सोडा वाटर व लेमोनेड व क्वचित् आइस्क्रीम हे पदार्थ मात्र ते आठवणीने मागवून घेत. १९२० साली त्याना हे शीतोपचार अखेरीला फार बाधले. मार्चमध्ये त्यांचा दौरा सिंधमध्ये निघाला. आगगाडीचा प्रवास जाग्रण व रोजचा भरगच्च कार्यक्रम यामुळे त्याना अतिशय शोष पडे, आणि दौरा संपवून सोलापूर परिषदेला ते निघाले तेव्हा वाटेत त्यानी आगगाडीत कोल्ड्रींक किती प्यावे याला सामाच राहिली नव्हती. आणि काहीचा समज असा आहे की, या उपचारांमुळे त्यांची प्रकृति जी बिघडली ती पुन्हा सावरली नाही. मनोगुण - टिळकांच्या बुद्धिमत्तेविषयी लिहिण्याचे कारणच नाही. पण बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांची स्मरणशक्तिहि दांडगी असे. फारा दिवसानी भेटलेल्या मनुष्याची ओळख ते जशी हटकून सांगत त्याचप्रमाणे फारा दिवसापूर्वी वाच- लेल्या ग्रंथातील उतारा ते चद्दिशी काढून देत. टिपणबुकाचे महत्त्व त्याना वाटत नव्हते असे नाही. पण या बाबतीत चंदावरकरांच्या अगदी उलट वृत्तीचे ते होते. चंदावरकरांची अशी ख्याति सांगतात की, त्यांच्याजवळ २५-३० वर्षांच्या अध्ययनातील टिपण बुके लिहिलेली तयार असत. हातात पेन्सिल घेतल्याशिवाय पुस्तक वाचावयाचे नाही व त्यातील आवडतील ते उतारे टिपल्याशिवाय पुस्तक बाजूला काढावयाचे नाही. यामुळे कोठल्या लिहिण्यात कोणती अवतरणे येतील याचा नियम नसे व त्यामुळे कोणत्याहि विषयावर लिहिणे चंदावरकराना सोपे जाई. पण टिळकांची वृत्ति अशी की, पुस्तक वाचताना हातात सहसा पेन्सिल घ्यावयाची नाही. मग वेळ मोडून टिपण बुके ठेऊन त्यात उतारे किंवा संदर्भाचे उल्लेख टिपणे ही गोष्ट तर दूरच. आणि जी गोष्ट मनुष्य स्वतः करीत नाही ती दुसऱ्याने केली असता सहजच त्याची थट्टा करावीशी वाटते. त्याप्रमाणे वकील बॅरिस्टर लोकांची टिळक फार थट्टा करीत. ते म्हणत की बॅरिस्टराचे ब्रीफ पाहिले म्हणजे मला इंद्र धनुष्याची आठवण होते. टेबलावर पाच सात रंगाच्या पेन्सिली व कोणत्या रंगाच्या पेन्सिलीच्या खुणेचा काय अर्थ हे जरी त्यांचे निश्वित नसले तरी त्यातल्यात्यात वेगवेगळ्या रंगाच्या खुणा करण्याची बॅरिस्टर लोकाना फार हौस. पण कित्येक मुकदम्याचे वेळी त्याना स्वतःला त्रीफस किंवा टिपणे तयार करावी लागली तेव्हा वकील बॅरिस्टरांच्या या खोडीत नाही म्हटले तरी थोडासा अर्थ आहे हे त्याना अनुभवाला येऊन कबूल करावे लागले. आणि खुणा करण्याचा प्रसंग आला म्हणजे मग स्वतः ते आपण बॅरिस्टराविषयी काय बोलतो याची आठवण होऊन स्वतःची थट्टा करण्याच्या ऐटीने म्हणत