पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ हा सर्व ग्रंथ त्याना आपल्या हाताने लिहावा लागला. ताई महाराजांच्या खटल्याचे काम औरंगाबादेस चालू असता सकाळी १० वाजेतों कागदाचे वाचन व चर्चा, संध्याकाळी ५॥ वाजेपर्यंत कोर्टात हजेरी, व त्यानंतर घरी परत आल्यावर कोर्टातील कामाची रुजुवात चर्चा त्याच्या संकलित तारा व पत्रे आणि इतर पत्रव्यवहार अशा- रीतीने सकाळी सातपासून रात्री ८-८॥ पर्यंत टिळकांचा सर्व दिवस एकसारखा कामात जाई. गीतारहस्याची पहिली आवृत्ति छापली जात असता ते सकाळी - उठून सर्वोच्या आधी चित्रशाळेत दाखल होत व कंपॉझिटर करेक्टर यांच्यामागे. हात धुवून लागत. अशा रितीने त्यानी ही पहिली आवृत्ति दोनतीन महिन्यात काढली. कॉंग्रेस परिषदा वगैरे प्रसंगी ते सबंध बैठकांना हजर राहात व बैठकी संपताच अपरात्रीपर्यंतहि भेटी देत घेत चर्चा करीत भांडत तणतणत, निदान आपली मते मोठमोठ्याने बोलून लोकाना पटविण्यात त्यांचा काल जाई. कंटाळा हा शब्द खरोखरच त्याना माहित नव्हता व कंटाळा येई तेव्हा तो काम अप्रिय असेल तर त्याचा. श्रमाचा नव्हे. त्यातल्या त्यात काम आयत्या वेळी करण्याची त्याना विशेष हौस यामुळेहि त्यांच्यावर बराच ताण पडे पण ते तो हौसेने सोशीत. त्यानी नियमित रीतीने स्वस्थपणाने बसून ठरल्या वेळी मजकूर लिहून हातावेगळा केला व वेळेच्या आधी बाजूला काढून ठेवला असे क्वचित घडे. कारण स्वतःचे काम पुढे असले तरी भेटीला येणान्याच्या कामाला ते अग्रपूजेचा मान देत. त्यांच्या भिडेचा जाच लोकाना न होता स्वतः त्यानाच होत असे. पण अशा अनियमितपणाने वागण्यात जणूकाय एक प्रकारची हौसच त्याना वाटे. जेवणाखाणाच्या वेळेत ते अनियमितपणा करीत पण जेवणाच्या पदार्थात तो करीत नसत. टिळक इतर कोणाहि प्रमाणे पोटभर जेवीत हे खरे असले तरी त्यांचे लक्ष जेवणातील पदार्थांच्या रुचीकडे फारसे नसे. पदार्थ चांगले म्हणून त्यांची स्तुति करणे किंवा वाईट म्हणून त्यांची निंदा करणे या गोष्टी ते सहसा करीत नसत. आणि कोणी मुद्दाम विचारले तर मग मुद्दाम चव घेऊन उत्तर देत. हा अनुभव त्यांच्या घरच्या मुलाबाळांचाच नव्हे तर मंडाले येथे त्यांच्या दिमतीला असलेल्या स्वयंपाक्याचाहि होता. वाईट झालेला पदार्थ टिळकाना खावा लागला तरी त्याचा खेद स्वतः त्यांच्यापेक्षा तो पदार्थ करणारालाच अधिक होई. दोन वेळच्या जेवणाशिवाय व चहाशिवाय टिळकानी इतर वेळी खाल्लेले असे कोणी सहसा पाहिले नाही. आणि आवडीचा म्हणून अमुक पदार्थ मुद्दाम करावयाला सांगितला आणि स्वस्थ बसून तो रुचीने व आनंदाने त्यानी खाल्लेला असे तर कोणासच आठवत नाही. चार मंडळीत बसून ते घेत म्हणजे चहा. खाण्याच्या पदार्थावर त्यांचा इतका ताबा असे की भाते सोडून गहू, गहू सोडून सातू, आणि तुरुंगात सात् सोडून गहू व फिरून गहू सोडून सातू, असे फेरबद्दल करण्याचे त्याना कधीहि संकट वाटले नाही. आता मनुष्यच आहे म्हणून त्याला एकाच अन्नाची अरुची सहज उत्पन्न होणार. तशी टिळकाना होई. पण त्या अरुचीचा