पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक ७ शारीरिक गुण - टिळकानी लहानपणी मेहनत केली तरी मोठेपणी ते कोणत्याहि प्रकारचा व्यायाम घेत नसत. नित्याच्या कामकाजातली मेहनत व दगदग ही त्याना पुरेशी होई. शिवाय त्यांचा आहार नेहमी बेताचा असल्यामुळे शारीरिक श्रमाची विशेष आवश्यकता नव्हती. अगदीच घरी करमेनासे झाले तर एखादे दिवशी संध्याकाळी मित्रमंडळीबरोबर गप्पा मारीत ते लकडीपुलाकडे फिरावयास जात. पण व्यायाम नियमितपणे न घेतला तरी शरीरसामर्थ्य त्यांच्या स्वतःच्या कामापुरते भरपूर असे. उदाहरणार्थ सिंहगडावर उन्हाळ्यात त्यांचा मुक्काम असे तेव्हा ते फिरावयाला म्हणून निम्मा डोंगर उतरून चढून जात. पण विशेष प्रसंगी सबंध गड उतरून एखाद्या गावी जाऊनहि परत वर येत. अगदी पुढे पुढे ते गढ चढावयाला खुर्ची करीत. टिळकांच्या कामाचा व्याप जसा मोठा होता तसेच विश्रांति न घेता काम करण्याची त्यांची शक्तिहि जवरदस्त होती. कार्यांच्या तन्मयतेने तहानभूक विसरणे ही गोष्ट अतिशयोक्तीची वाटली तरी काही मर्यादेपर्यंत ती खरी असते. आणि त्याची जास्तीत जास्त मर्यादा टिळकांच्या बाबतीत लोकाना पाहवयाला सांपडली असती. स्वतः त्यानीच एका स्नेह्याजवळ असे उद्गार काढलेले नमूद आहेत की, “ मुंबईच्या एका राष्ट्रीय सभेच्या वेळी केसरीचे जादा अंक काढण्याकरिता मी एकसारखा एका खुर्चीवर बसून ३६ तास काम करीत होतो. " व ही गोष्ट शब्दशः खरी असली पाहिजे असे मानण्याइतके त्यांचे इतर अनुभव लोकाना आले - आहेत. त्यांच्या मोठमोठ्या दौऱ्यातून ते दिवसभर कसे काम करीत हे लोकानी पाहिलेच आहे. व ते काम दंगलीचे हालण्याचालण्याचे बोलण्या ओरडण्याचेहि असे. अर्थात् घरी खुर्चीवर किंवा फार तर आराम खुर्चीवर बसून लिहिण्या-- वाचण्याचे किंवा चर्चेचे काम ते तासनतास न दमता करीत असतील यात काय आश्चर्य ? वापट प्रकरणात रोज कमिशनपुढे हजर राहून शिवाय उरलेल्या वेळात पाचपन्नास बंद लिहून कमिशनपुढे वाचण्याकरिता ते वकीलाच्या हातात देत हे या ग्रंथाच्या पहिल्या खंडात आम्ही नमूद केलेच आहे. चिरोलकेसची टिपणgh तयार करताना व हकीगती लिहून काढताना त्यानी दिवस की रात्र हे पाहिलेच नाही. सिंहगडावर 'आर्यांचे मूल वसतिस्थान : हा ग्रंथ लिहिताना दोन प्रहरी एकदा लिहावयास बसले, म्हणजे रात्री जेवणाचे वेळे- पर्यंत ते हालत नसत व एकादा भाग पूर्ण करावयाचा असल्यास जेवणालाहि अवेळ करीत. त्यांच्या या सपाट्यात सांपडलेले लेखक दमून जात पण टिळक- स्वतः दमत नसत. पण या सांगोवांगीच्या गोष्टीचे प्रत्यंतर त्यांच्या गीतारह- स्याच्या हस्तलिखित प्रतीत प्रत्यक्षच पहावयास सापडते. एरवी एवढा मोठा ग्रंथ इतक्या थोड्या अवधीत लिहून पुरा होणे शक्य नाही. व त्यातहि विशेष गोष्ट लक्षात ठेवण्याची ती ही की टिळकाना स्वतः हाताने लिहिण्याचा कंटाळा असे व तोंडाने मजकूर सांगून लिहविण्यात त्यानी सारा जन्म घालविला. असे असता