पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

W लो० टिळकांचे चरित्र भाग ९ मुलगा विश्वनाथ हा मोठा म्हणजे वीस वर्षांचा कॉलेजात शिकत असता प्लेगने वारला. टिळकांच्या मरणकाळी धाकटे दोन मुलगे कॉलेजात शिकत होते. एक फर्ग्युसन कॉलेजात बी. ए. च्या वर्गात व दुसरा मुंबईस ग्रँट- मेडिकल कॉलेजात होता. टिळकांच्या मृत्यूनंतर काही दिवसानी या दोघानीहि कॉलेज सोडले व इल्ली ते वडिलांच्या निरनिराळ्या ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाचे व भाषांतरांच्या छपाईचे वगैरे कामे करीत असतात. टिळकांच्या हयातीत एका मुलाचा विवाह १९२० साली झाला. तीनहि मुलींचे विवाह आधी बरीच वर्षे झालेले होते. सर्वात थोरली मुलगी कृष्णाबाई नाशिकचे वकील व म्युनिसिपल प्रेसिडेंट विश्वनाथपंत केतकर बी. ए. एलएल बी याना दिली. हा विवाह १८९२ साली झाला. दुसरी मुलगी दुर्गाबाई हिचा विवाह १९०२ साली पांडुरंगराव वैद्य यांच्याशी झाला. हे बी. ए. एल्. सी. ई. असून हल्ली सरकारी इंजिनिअर खात्यांत नोकर आहेत. तिसरी मुलगी मथुबाई इचा विवाह डॉ० प्रो. श्रीरंग मोरेश्वर साने यांच्याशी १९०५ साली झाला. साने है तेव्हां अलाहाबादेस कॉलेजात शिकत होते. त्यांचे वाडवडील इकडून बाजीराव- शाहीत उत्तर हिंदुस्थानात गेले ते तिकडेच राहिवासी झाले होते. लग्न झाल्यावर टिळकानी साने यांची बुद्धिमत्ता लक्षात घेऊन त्याना हिंदु एज्युकेशन फंडाची शिष्यवृत्ती देऊन व त्याचे भरीला स्वतःचे पैसे घालून १९०६ साली जर्मनीला रसायन शास्त्राच्या अभ्यासाला पाठविले. तेथे सुमारे सहा वर्षे राहून पी. एच. डी. ची पदवी मिळवून इकडे आल्यावर त्यानी मुंबईस एन्. पॉवेल कंपनीच्या रसायनशाळेत काही वर्षे रससंशोधनाचे व प्रयोगाचे काम केले. काही दिवस लाहोर येथे त्यानी प्रोफेसरी केली होती व हल्ली लखनौ येथील भौतिक शास्त्राभ्यासाच्या युनिव्हर्सिटीत ते कायमचे प्रोफेसर आहेत. टिळकांच्या पत्नी सौ० सत्यभामाबाई यांचे स्वभाववर्णन आम्ही या चरित्रग्रंथाच्या पूर्वार्धात दिलेच आहे. त्यांना गृहसौख्य एका प्रकारचे फार चांगले होते. ते असे की टिळकानी त्याना कधी काही उणे पडू दिले नाही व रागाचा एक शब्दहि कधी बोलले नाहीत. पतीची साधी राहणी व उदात्त चरित्र डोळ्यापुढे असल्यामुळे त्यानीहि आपले चारित्र्य तसेच ठेवले होते. त्याना साक्ष- रतेचे शिक्षण नव्हते. तथापि आपल्या पतीच्या उद्योगाचे मर्म समजण्याइतकी मार्मिकता त्यांच्या अंगी होती. तसेच पतीची लोकप्रियता व कीर्तिमत्ता यांची नित्य नवी उदाहरणे डोळ्यापुढे येत असल्याकारणाने सौ० सत्यभामाबाईना घर प्रपंचात टिळकांचे लक्ष कमी का असते याची पूर्ण जाणीव होती. या बाईना आपल्या पतीप्रमाणेच मधुमेहाची व्यथा होती. व त्यातहि सर्व काळ चिंतेत व दुःखात जाई. या कारणाने त्या टिळक हे तुरुंगातून सुटून येण्याच्या आधीच निवर्तल्या. टिळकांचा संसार उध्वस्त झाला पण या हिंदु स्त्रीने सौभा- ग्याची शर्यत जिंकली.