पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक ५ शेताचे ते सुपरिंटेंडेंट होते. ती जागा सोडून त्यानी बेलापूर सिंडिकेटकडे नोकरी धरली व हल्ली हरिगाव येथे कंपनीच्या ऊसाच्या लागवडी खात्याचे ते मुख्या- धिकारी आहेत. त्यांच्याचकडे कायम राहिले असे थोरले भाचे धोंडोपंत विध्वंस, याना त्यांनी लहानपणापासून वाढविले शिकविले त्यांचे लग्नकार्य केले सगळा संसार चालविला. तात्पर्य जन्मभर मुलासारखे वागविले. आणि धोंडोपंत यानीहि टिळकांची सेवा मुलाहून अधिक केली. टिळक न्यू स्कुलात असता घरची भाजी आणण्यापासून त्यांची सेवा सुरू झाली. ती घरची भाजी तर ते टिळकांच्या आजन्म आणीतच होते. परंतु पुढे प्रत्येक काम घरच्या संसाराचे, म्हणजे लग्न- मुंजीच्या समारंभांची व्यवस्था करणे, घरचे नित्यनैमित्तिक कार्य करणे, उपवर मुलीना स्थळे शोधणे, किंवा बाहेरचे म्हणजे छापखान्याचे वर्तमानपत्राचे निवड- णुकीचे लातूरच्या गिरणीची व्यवस्था करण्याचे गुप्त स्वरूपाच्या बातम्या कागद पत्र आणण्या पोचविण्याचे पैशा अडक्याचा व्यवहार करण्याचे ही धोंडोपंत विध्वंस यानीच केली. आणि कोलंबो येथे टिळकांनी मृत्युपत्र केले त्यात धोंडोपंत याना आपल्या छापखानावर्तमानपत्रांचे कायमचे व्यवस्थापक व मृत्युपत्राचे एक्झी- क्यूटर नेमले. टिळकांचा धोंडोपंतावर पूर्ण विश्वास होता व धोंडोपंतानीहि तो आजन्म व मरणोत्तर संभाळला. खरा हरकामी मनुष्य संसारात कसा असतो याचे टिळकांच्या घरी धोंडोपंत हे एक मूर्तिमंत उदाहरण होते. त्यानी कॉलेजचा अभ्यास सोडून घर खाते लवकरच हाती घेतले. व ते घेण्याला टिळकाना घरचा असा मनुष्य हाताशी हवाच होता. आणि जिकडे फेकतील तिकडे बिन बोभाट बिन तक्रार जाणे व पडेल ते काम करणे यामुळे जन्मभर टिळकाना धोंडोपंत यांची फार मदत झाली. टिळकानी घरची अशी काळजी फारशी कधी वाहिलीच नाही. पण जी काय त्यानी वाहिली तिचा भार धोंडोपंतावर असल्यामुळे व तो संभाळण्याची पात्रताहि धोंडोपंतामध्ये असल्यामुळे घरातून पाऊल बाहेर पडल्या- पासून परत येईपर्यंत त्यानी घरी कसे होईल ही चिंता कधी बाळगिली नाही. १८९७ सालापर्यंत केसरीछपाईचे बटवड्याचे व हिशेबाचे सर्व काम आर्यभूषण छापखान्याकडे आणि पैशा अडक्याचा व्यवहार चित्रशाळेकडे असल्यामुळे धोंडोपंताना घरखर्चीला लागणारे पैसे आणण्यापलीकडे काही काम नव्हते. पण १८९७ साली चित्रशाळेचे वासुदेवराव जोशी त्या वेळचे टिळकांचे कुलमुखत्यार हे ब्रह्मदेशांत गेले व तिकडेच फार दिवस राहिले आणि आर्यभूषणचे मालक हरिपंत गोखले यानी दगा देऊन केसरी छापीत नाही म्हणून सांगितले, तेव्हा धोंडोपंताना विंचुरकरांच्या वाड्यांच्या पडवीत चार देवद्वारी खोके मांडून कचे- रीची स्थापना करावी लागली. व तेव्हांपासून आज तीस वर्षे पर्यंत सर्व प्रकारच्या परिस्थितीतून निभावून त्यानी ते काम चालविले आहे. टिळकाना एकंदर ८/९ अपत्ये झाली. पैकी त्यांच्या मरणकाळी तीन मुली व दोन मुलगे हयात होते. दोन तीन मुले लहानपणीच निवर्तली. पण एक