पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ ताना ते ताठ चालत. मात्र वयोमान झाल्यावर पाय लटपटत असत. तथापि इतर कोणाचा आधार त्याना घ्यावा लागत नसे. पुढे पुढे दृष्टीला मंदपणा आल्या- वर उजेडातून अंधारात जाताना किंवा पायन्या उतरताना त्याना जवळच्या माण- साने हात देण्याची जरूरी वाटे. त्यांची दृष्टी साफ नव्हती तरी आरशी लावण्याचा त्यानी कंटाळाच केला. त्यांच्या चेहऱ्याची व डोळ्यांची ठेवण चित्रात दिसते, पण डोळ्यात जे तांबूस पिंगट वर्णाचे तेज असे व ज्यातून त्यांचे अनेक स्वभाव- गुण प्रगट होत ते चित्रात अर्थातच दिसून येत नाही. त्यांचा आवाज जात्या मोठा होता. व ते साधा वादविवाद करीत असले तरी भांडतात असे वाटे. आणि रागा- वून बोलू लागले म्हणजे मग काही विचारावयासच नको. एकदा थट्टा मस्करी सुरू असता विषय असा निघाला की सर्व पुढाऱ्यांची मिळून एक नाटक कंपनी काढावी. तेव्हा टिळक म्हणाले 'मला पार्ट कोणता द्याल ?' त्यावर एक विनोदी मित्र म्हणाला 'तुम्हाला पार्ट देण्याची सोय नाही. कारण तुमचे आत्मगत भाषणहि दूर बसून लोकास ऐकावयाला मिळणार मग पैसे देऊन तिकीट काढून आत कोण येणार ! ' टिळकांचा गृहस्थाश्रम - टिळकांचे कुटुंब सात आठ माणसांचे असे. त्याना वडिलांच्या बाजूचे आत म्हणजे चुलते. त्यांच्या संबंधी थोडा उल्लेख या ग्रंथाच्या पूर्वार्धात आलाच आहे. या चुलत्यांचे दोघे सुलगे प्लेगने वारले. एक मुलगी तीहि वारली. फक्त सून राहिली. तिच्याकरिता टिळकानी स्वतःचे पितृधन पाच हजार रुपयांचे होते त्यात भर घालून तिच्या करिता कोकणात एक घर व बागायती ठिकाण घेऊन ठेवले, व तिच्या हयातीनंतर ते आपला धाकटा भाचा गंगाधरपंत विध्वंस यास देणगी दाखल द्यावे असे मृत्युपत्रात लिहून ठेवले. टिळक घराण्याची मंडळी कोकणात व देशावर बरीच आहेत पण त्यांचे जाणेयेणे कोणा- कडे फारसे नसे. त्याचप्रमाणे टिळकांच्या आजोळचे लोकांचाहि त्यांचा विशेष संबंध राहिला नाही. टिळकांच्या सासुरवाडची बाळ घराण्याची मंडळीहि त्यांच्या घरी कधी येऊन राहिली किंवा टिळकांचे मुलगे आपल्या आजोळी म्हणून कधी विशेष गेले असे घडले नाही. कोकणाशी टिळकांचा संबंध राहिला तो त्यांचे दोघे भाचे आणि मामेभाऊ रंगोपंत महाजन यांचा मुलगा गंगाधरपंत यांच्या पुरता. टिळकांचे ममत्व आपल्या बहिणीच्या ठिकाणी असे. व तिच्या घरची स्वास्था असावी तशी नाही म्हणून ते आपल्या मेहुण्याला मधून मधून खचीला पाठवीत. आणि सगळे भाचे त्यानी एकामागून एक शिकण्यासाठी पुण्यास आणून घरीच ठेवले. यापैकी दोन धाकटे भाचे अकाली वारले. वडिलापैकी लहान गंगाधरपंत हे पुण्यासच असतात. गंगाधरपंत महाजन हे शेतकी कॉलेजात शिकून पदवी घेऊन तयार झाले तेव्हा देशी साखरेचे काम शिकण्याला त्याना टिळकानी पर- देशात पाठविले, पुढे त्याना सरकारी नोकरी लागली व मांजरी येथील सरकारी