पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक पण या सर्व चित्रात व प्रतिमात टिळकाना परप्रांतीय लोकानी हटकून ओळखण्याच्या खुणा म्हटल्या म्हणजे त्यांचा आंगरखा व त्यांची पगडी याच होत. आंगरख्याचा पांढरा रंग व पगडीचा तांबडा रंग है अखेरपर्यंत पेटंट घेतल्याप्रमाणे अबाधित राहिले. आणि टिळक विलायतेस गेले नसते तर त्यांचे कोटपाटलोण घातलेले चित्र कधीच कोणास पाहावयास मिळाले नसते. या विदेशी पोषाखात मुद्दाम कोणी विनंति केली तरी ते फोटो काढून घेण्याला उभे राहत नसत. कारण हा विदेशी पोषाख घालणे हे एक संकट व अनिर्वाय दूषण असे त्याना वाटे, आणि आज अशा पोषाखात त्यांची चित्रे पाहावयास सापड- तात ती विलायतेत निघालेल्या फोटोवरून तयार केलेली आहेत असे समजावे. विदेशीच काय पण देशी पोषाखातहि त्यानी कधी फारसा फरक केला नाही. कित्येक तैल चित्रात त्यांच्या उपरण्याचा काठ जरीचा दाखविलेला असतो. परंतु तेहि अपवादाला नियमं मानण्यासारखेच अयुक्त होय. कारण त्यांच्या अंगा- वर जर कधीकाळी कोणी जरीचे उपरणे पाहिले असेल तर ते लग्नासारख्या समारंभात व तेहि भाचाने जरीचेच उपरणे वेळी पुढे केले म्हणून. एखाद्या सभेत समारंभात एखाद्या हौशी भक्ताने जरीचे उपरणे अर्पण केले तर ते त्या समारंभापुरते त्यांच्या अंगावर राहत असे. पोषाखाची ही गोष्ट. मग अलंकार किंवा इतर शोभा याविषयी बोला- वयालाच नको. पुरुषाचे स्वाभाविक अलंकार म्हणजे डोक्याचे केस व दादी- मिशा. यासंबंधानेहि त्यांची उदासीनवृत्तिच असे. त्यानी डोक्यावर घेरा किंवा संजाब कधी ठेवला नाही. मिशा कोरल्याकातरल्या नाहीत. श्मश्रु चांगली वाढल्याशिवाय केली नाही. व केली तेव्हाहि न्हाव्याकडून शेंडीला कधी बोटभर तेल लावून घेतले नाही. आपल्या शरीराला दुसऱ्याचा स्पर्श हे दूषण मानण्याचा त्यांचा स्वभाव असे. यामुळे दमले भागले किंवा आजारी पडले तरी पाय दाबून घेणे अंग चेपून घेणे पाठीवर बुक्या मारून घेणे अशा गोष्टी नोकराकडून जवळच्या लोकाकडून किंवा घरच्या मुलाकडूनहि त्यानी कधी करून घेतल्या नाहीत. याच स्वभावामुळे त्यांच्या मित्राने देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलणे चालणे केले असे कोणास पाहावयास सापडले नाही. मनुष्यघाणा असा त्यांचा स्वभाव नव्हता. किंबहुना सोबतसंगत त्याना प्रिय असे. तथापि मनाप्रमाणे त्यांच्या शरी- रालाहि स्वातंत्र्याची आवड फारच होती. टिळकांचा वर्ण निमगोरा होता. उंची पाच फूट पाच इंचाहून अधिक नव्हती. म्हणजे त्यांची गणना ठेंगण्या किंवा फार तर मध्यम उंचीच्या माणसा- तच करिता येईल. त्यांचे अंग सडपातळ होते. उतार वयातहि त्यांचे पोट सुट- लेले नसून सालीसारखे पातळ असे. लहानपणी त्यानी तालीम केली होती तरी त्यांचे खांदे किंवा छाती यावर त्या मेहनतीचा विशेष परिणाम झालेला दिसून येत नव्हता. पण उलट अंगाच्या काठीला बाक किंवा पोकदि आले नव्हते. चाल-