पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ अधिकान्याना ती शोभत नाही. आणि विलायतेतील ज्युरी तर काय ? त्यांच्यापुढे सर एडवर्ड कार्सन यानी खुनाच्या नांदीपासून जे नाटक सुरू केले ते खुनाच्या भरतवाक्यात संपविले. आणि त्यात गणेशोत्सव कोंबले आखाडे कोंबले शिवाजी उत्सव कोंबले काय वाटेल ते कोंबले. टिळकांची मजल अशा तरुणाशी फार तर आत्मसंरक्षक किंवा स्वाभिमानदर्शक कृत्यांचा उपदेश करण्यापर्यंत गेली असेल. पण 'ऊठ जा आणि, उच्च राजकीय हेतूकरिता, नाहक अत्याचार कर' असे त्यानी कोणाहि तरुण मुलाला सांगितले असणे शक्यच नाही. आणि पहिली दोन प्रकारची कृत्ये करण्यास सांगितली असली तर ती वावगीहि नाहीत.