पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळक व अत्याचार ५३ कानी आखाडे काढण्याला उत्तेजन दिले असा एक त्यांच्यावर आरोप केला आहे. पण याहून हास्यापद आरोप दुसरा कोणता असणार ? कारण हा आरोपच होऊ शकत नाही. टिळकं एक राजकारणात पडले व जहाल मताचे होते म्हणून त्यांच्यावर हा आरोप करणे चिरोलसाहेबाना सोईचे वाटले. पण कोल्हापूर- करमहाराजानी आखाडे कुस्त्या पहिलवानगिरी याना एकंदरीने जितके उत्तेजन दिले त्याच्या एक दशांशहि टिळकानी दिले नसेल. गावोगाव आखाडे असतातच व नवे निघतातच. शरीरसामर्थ्य संपादण्याच्या त्या शाळाच होत. व इतर शाळा- प्रमाणे वडील पिढीची माणसे आपल्या खर्चाने त्या काढून देतात किंवा तरुणपिढीची माणसे आपल्या हौसेने काढतात. आणि आखाड्याना उत्तेजन म्हणजे अत्याचा- राना उत्तेजन हे खरे असले तर सगळ्या जगालाच अत्याचारी म्हणावे लागेल. विलायतेतहि बलवर्धनाचे असे आखाडे नसतील असे नाही. तेथे 'शूटिंग क्लब्स' तर खास आहेत. मग त्या क्लबात सर्व अत्याचारी लोकच निर्माण होतात काय ? तात्पर्य, मनुष्य बलवान असणे हा त्याचा स्वाभाविक धर्म व हक्क आहे व त्याच्या हितचिंतकाला तो हक्क त्याला मिळवून देण्याच्या कामी मदत करावीच लागते. पण स्वतःच्या आरोग्याशिवाय शरीरबलाचा दुसराहि उपयोग असतो. कालिदा- साने रघुवंशात म्हटलेच आहे म्हणजे " बलमार्तभयोपशान्तये विदुषां सत्कृतये बहुश्रुतं । वसु तस्य विभोर्न केवलं गुणवत्तापि परप्रयोजना || या राजाचे बल दुसऱ्याचे भयनिवारण करण्याकरिताच होते, दुस- न्याला पीडा करण्याकरिता नव्हते. त्याचा बहुश्रुतपणा हा विद्वान लोकांचा सत्कार करण्याकरिता होता, स्वतःची विद्वत्ता गाजविण्याकरिता नव्हता. तसेच त्याचे द्रव्य दुसऱ्याच्या उपयोगाकरिता होते, स्वतःच्या चैनीकरिता नव्हते. व त्याचे गुण इतर गुणीजनांचा परामर्ष घेण्याकरिता होते, स्वतःच्या वैभवाकरिता नव्हते.” तात्पर्य मनुष्याचा प्रत्येक गुण किंवा त्याची प्रत्येक शक्ति हीं नेहमीच आपल्याला उपयोगी पडण्याकरिता असतात असे नाही. तर तीं परप्रयोजन म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याकरिताहि केव्हा केव्हा असतात. अशा बलसंपन्न तरुण पिढीचा उपयोग कोठे नजरेसमोर अन्याय घडत असला तर त्याचे निवणार करण्याला उपयोगी पडावा अशी अपेक्षा टिळकानी केली असल्यास त्यात काय गैर ? हिंदुस्थानात अत्याचारी तरुण नसोत, पण समोर दिसणारा अन्याय निवा- 'रण करतील असेहि तरुण नसावे काय ? पण टिळकाकडे अशा तात्त्विक दृष्टीने किंवा राष्ट्रीय दृष्टीने चिरोल साहेब कसे पाहणार ? व सरकार तरी कसे पाहणार ? म्हणून तेजस्वी ओजस्वी असे काही लोक अत्याचारी आणि त्यांच्यावर टिळकांचे प्रेम म्हणून टिळक अत्याचार प्रवर्तक अशी सरळ अनुमाने त्यानी बसविली. एखाद्या पोलिस रिपोर्टात ही विचारसरणी शोभेल. पण मुत्सद्दी म्हणविणाऱ्या