पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ लो. टिळकांचे चरित्र भाग ८ नाही, तर 'टिळक असावे तितके जहाल नाहीत' असे म्हणून त्याना मूर्खात काढू पाहणान्या लोकाना त्यानी उलट उपदेश काय केला हे सांगून टिळकांच्या अभि- मानाने त्या लोकांचा निषेध करण्याकरिता ! तेव्हा टिळक जिवंत तरी होते.. पण टिळक वारल्यावर गंगाधरराव देशपांडे यानी जी आठवण लिहिली ती तर टिळकांच्या बचावाकरिता नाही ना? आता टिळक मेल्यावर त्यांच्यावर कोण खटला करतो ? अर्थात् त्यानी दिलेले संभाषण यथार्थच होय. टिळकाशी अनेक प्रकारच्या स्वभावांच्या लोकांचा संबंध येत होता ही गोष्ट खरी. पण पुष्कळ लोकाशी संबंध आला म्हणून टिळक आपला स्वभाव कसा सोड- णार ? एखादा भाविक श्रद्धाळू मनुष्य जर टिळकांना येऊन म्हणू लागला की " देश वर येण्याकरिता मी सर्वसंगपरित्याग करून जपाला अनुष्ठानाला बसतो.” तर ते त्याला म्हणाले असते " तूं चूक करितोस. निष्कामकर्मप्रवृत्ति व सदिच्छा हा ईश्वराराधनेचा एक मार्गच आहे. लोकसंग्रहकारक व लोकोपयुक्त कर्म मनुष्याने करीत राहिले पाहिजे. हा ईश्वराचाच गीतेत उपदेश आहे. म्हणून तुझ्यासारख्या निष्ठावंत माण- साचा उपयोग नुसती माळ ओढीत बसण्यापेक्षा आम्हा चार लोकानी आरंभि- लेल्या कार्याकडेच व्हावा. " तसेच उलट आततायी अत्याचारी माणसे टिळका कडे येऊन — एष पन्थाः एतत्कर्म-' असे म्हणती तर " अति तामसवृत्ति हो नाशाला कारण होते म्हणून तुम्ही ती टाकून देऊन नित्यकर्मप्रवृत्त व्हा " असेच टिळकानी त्याना सांगितले असते अशी कल्पना का करू नये ? टिळक केव्हाहि आपल्या स्वभावाप्रमाणेच उपदेश करणार व आपल्या मार्गालाच येऊन लोकानी मिळावे आणि आपला रजोगुणी सांप्रदाय वाढावा अशीच त्यांची इच्छा असली पाहिजे. अत्याचारी प्रवृत्तीचे अनेक लोक त्याना येऊन भेटले असतील हे खरे आहे. त्यांची कीर्ति व देशभक्तिच अशी होती की त्यांचे दर्शन घ्यावे किंवा त्याना भेटावे किंवा त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांचा सल्ला घ्यावा असेच कोणालाहि वाटावे. त्या काळात युरोप अमेरिकेत जाऊन अनेक लोक परत येत. तेथे चाललेल्या चळवळी पाहात. तेथे मिळणाऱ्या विद्या शिकून येत व तेथील स्वतंत्र विचाराच्या लोकांच्या उपदेशानी कान भरून व मन भारून घेऊन येत. असे. लोकं टिळकाना भेटल्याचा पुरावा गुप्त पोलिसखात्याच्या दप्तरी पुष्कळ असेल असे आम्हास वाटते. कारण हे असले लोक आले म्हणजे आपली गुप्त - पोलिसरूपी पडछाया बरोबरच घेऊन येत. पण ते टिळकाना भेटले हा काही टिळकानी त्यांचे मानले किंवा उत्तेजन दिले याचा पुरावा होत नाही. असल्या दरवाजाबाहेरच्या कितीतरी पुराव्याने सरकारचे मन कलुषित झाले असले पाहिजे. . आता टिळकाना जर अत्याचारप्रवर्तन करावयाचे नव्हते तर त्याना तरु णपिढीच्या शक्तीचे बलवर्धनाचे तेजाचे ओजाचे इतके कौतुक का वाटावे ?- असा भोळा प्रश्न कित्येकाना सुचेल. पण हे वरील गुण फक्त अत्याचाराचे साधन होत असे समजणे हीच मुळातली चूक होय. चिरोलसाहेबांच्या पुस्तकात टिळ-