पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळके व अत्याचार ५१ कोर्टापुढे सर्व हकिकत आल्यावर शिक्षा तर देणे प्राप्तच पण न्यायाधिशाने थोडी दिली व तीहि त्याची शिक्षा माफ व्हावी म्हणून कलकत्त्यास वर्तमानपत्रातून व इतर रीतीने चळवळ झाली. याचा अर्थ सरळच असा नव्हे काय की घाती मनुष्याबद्दल लोकाना व स्वतः न्यायाधिशालाहि सहानुभूति वाटली व क्षमा करण्याची थोडीतरी बुद्धि झाली ? मग हे लोक व हा न्यायाधीश खुनाला उत्तेजन देणारे म्हणावयाचे की काय ? किंवा त्याच्या जागी स्वतः हे असते तर त्यानी तीच गोष्ट केली असती असे त्यानी मानावयाचे की काय ? आमचा मुद्दा हा की व्यक्तिशः अशा एखाद्या असाधारण प्रसंगी खुनी अत्याचारी मनुष्याचा कोणी गुण घेतला किंवा त्याला सहानुभूति प्रगट करण्याच्या रीतीने ती केली तर तो अत्याचारप्रवर्तक ठरत नाही. विशेष परिस्थि- तीत खुनी मनुष्याला अत्याचारी मनुष्याला तामसीपणाच्या पराकोटीला जाण्याचा मोह आवरला नाही असे म्हणण्याचाच त्यांचा अर्थ असतो. असे जुलुमी निर्दय लोक सरकारी नोकरीत कधी असतच नाहीत असे सरकारने तरी का मानावे १ जनरल डायर याचा कोणी खून केला असता आणि जर एखाद्या वर्तमानपत्राने लिहिले असते की 'ठीक झाले. अत्याचाराचा मोबदला मिळाला.' तर ते अत्याचाराला उत्ते- जन ठरले असते काय ? अशा प्रसंगी 'ईश्वरा घरी न्याय आहे' असेच कोणीहि म्हटले असते आणि ईश्वरा घरचा न्याय हा पुष्कळ वेळा असाच कठोर असतो. तो अत्याचारांच्या रूपाने प्रगट होतो. दयाळू ईश्वराच्या घरचा न्याय झाला म्हणून तो काही नेहमी गुलाबपाणी शिंपडूनच होत नाही तर गुलाबाच्या काट्याने ओरखडूनहि होतो. ईश्वरा घरचा न्याय म्हणणे ही श्रद्धाळू भाषा झाली. पण तिला खरे तत्त्वज्ञानाचे बौद्धिक स्वरूप आहे. म्हणजे कार्यकारणसंबंधाच्या विधानाचे स्वरूप आहे. आणि कार्यकारणसंबंध दिसतो तो बोलून दाखविणे हे उत्तेजनाच्या सदरात येऊ शकत नाही. का की कार्य याच्या घरचे नाही व कारण हि यांच्या हातचे नाही. दोन्ही परस्पर आहेत. ग्लॅडस्टनसाहेबानी जेव्हा आयर्लंडमधील तुरंग लोकानी डायनामाईटने उडवून दिला असे ऐकिले तेव्हा ते म्हणाले म्हणतात की 'याने तरी इंग्रज लोकांचे डोळे उघडतील.' या म्हणण्याचा काय अर्थ ! ईश्वरा घरचा न्याय झाला असाच याचा अर्थ. जुलूम असह्य झाला हे कारण व डायना- माईटचा अत्याचार हे कार्य. म्हणून काही ग्लॅडस्टन हा वरील अत्याचाराला उत्तेजन- देणारा होता असे कोणी म्हणत नाही. बंगालच्या अत्याचाराबद्दल टिळकानी संमति दर्शविली असा आरोप ठेवून त्याना शिक्षा देण्यात आली पण कोणत्या : बंगाली तरुणाने केसरी किंवा मराठा वाचला होता ? किंवा अत्याचारांचा उपदेश करण्याला बंगाल्यात टिळकांनी कोण दूत कधी पाठविले होते? बरे त्यांच्या कक्षेत येण्यासारखे जे लोक त्यांना टिळक प्रत्यक्ष कसा उपदेश करीत हे वर नाशिक व बेळगाव यासंबंधी जे सांगितले त्यावरून दिसून आलेच आहे. हिंदु- पंचाने त्यावेळी लिहिले ते टिळकाना पुढे खटल्यात उपयोगी पडावे म्हणून लिहिले