पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भाग ८ अत्याचाराना प्रवृत्त केले असते तर ते बिचारे तुरुंगात असता किंवा शिक्षा भोगून परत आले असता त्यांच्याविरुद्ध सरकारजवळ मत प्रगट करणे हा कृतघ्नपणा किंवा अघमपणांहि ठरला असता. व टिळकांच्या स्वभावाची ज्याला माहिती असेल तो, ते असा अधमपणा करतील असे कधीहि म्हणाला नसता. तात्पर्य टिळकांनी जाहीरनामा काढला तो जितका सरकाराला उद्देशून तितकाच वास्तविक लोकाना उद्देशून होता. युद्धाच्या विशेष परिस्थितीत, म्हणजे जमले तर सरकारच्या या संकटांतून, देशाला काही लाभ करून घेण्याच्या बुद्धीने त्यांनी जाहीरनामा काढला असला तरी, चळवळीत पडणाऱ्या लोकाशी प्रथमच बोलावयाचे व साध- नाविषयी सर्वसाधारण उपदेश त्याना करावयाचा म्हणून अत्याचाराविषयी एकंदरीने आपले खरे व प्रामाणिक मत काय हे प्रगट करण्याचा तो योग्य प्रसंग असेच त्याना वाटले असले पाहिजे. शिवाय असा उपदेश त्यानी कोणाला पूर्वी खाजगी रीतीने केला नसता तर प्रसिद्धपणे तो करण्याची त्याना अडचण वाटली असती. पण पूर्वी ते जे प्रसंगविशेषी खाजगी बोलले तेच प्रसिद्धपणे बोलण्याची त्याना चोरी का असावी ? १९०६ साली नाशिकच्या मुलाना त्यानी काय उपदेश केला हे तत्कालीन त्रयस्थाच्या स्वतंत्र पुराव्यावरून म्हणजे हिंदु पंचातील लेखावरून १९०६ सालीच प्रसिद्ध झाले होते. आणि त्याचेच दुसरे प्रत्यंतर गंगाधरराव देशपांडे यांच्या आठवणीत आढळते. ते लिहितात "बेळगावास १९०६ साली गणपतीच्या उत्सवाकरिता प्रथमच टिळक बेळगावास आले. गोविंद- राव याळगी हे स्वयंसेवकांचे पुढारी असून त्यांच्याबरोबर शेदोनशे उत्साही व तालीमबाज असलेले तरुण त्यांच्या दृष्टीस पडले. मिरवणूक संपल्यानंतर लोक- मान्यानी मला एकीकडे म्हटले 'मी नाशिकाहून आता नुकताच आलो आहे. तेथेहि मला अशीच तरुणमंडळी दिसली व काही मला भेटली. त्यांचा उत्साह व महत्त्वाकांक्षा अपूर्व आहे पण त्यांच्यामध्ये थोडा मूर्खपणा आहे. तुमच्या तरु- पाना सांभाळा. अशा मूर्खपणामुळे कार्यहानि होते ! " टिळकानी जाहीरनामा काढला ती वेळ समालोचनाची व नवीन धोरण आखण्याची होती. अशाहि वेळी समजा एखादे उदाहरण वीरनवालीसारखे किंवा दुसरे घडते व एखाद्या जुलुमी दुष्ट चांडाळ निर्दय मनुष्याचा एखादा निस्वार्थी हुतात्मा वीर वध करता तर त्याहि वेळी टिळकानी असेच म्हटले असते की वध झालेल्या मनुष्याने आपल्या कर्माचे फळ भोगले. आणि घाती मनुष्याने जरी अत्याचार केला तरी तो त्याने निःस्वार्थी बुद्धीने केला व केवळ जुलमाचा प्रतिकार करण्याकरिता केला. तथापि असे म्हणणे म्हणजे त्या तर नाहीच पण तशा अत्याचाराला त्यानी उत्तेजन दिले असे म्हणणे चूक होईल. नुकते परवा कलकत्त्यास एक उदाहरण घडले. कल- कच्यातील एक बदमाष श्रीमान मनुष्य पैशाच्या बळावर नेपाळातील मुली आण- वून त्याना नुसत्या भ्रष्टच करीत नसे तर त्यांचा छळहि करी. ही गोष्ट एका नेपाळी तरुणाला सहन न होऊन त्याने त्या बदमाष मनुष्याचा खून केला.