पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळक व अत्याचार ४९ पुढे एखादा होणारा खटला वाचवावा अशा आपत्तीत ते सापडलेले नव्हते. सर- कारच्या दृष्टीने त्यांची जी काही पापे असतील त्यांची झडती १९०८ साली व पूर्वी १८९७ साली होऊन गेली होती. बरे, त्यांच्यावर एखादा नवा खटला उप- स्थित करण्यासारखी सामुग्री सरकाराजवळ जर असती तर त्यानी ती पुढे काढण्याला केव्हाही कमी केले नसते. कारण टिळकांची कटकट चुकवावयाची तर बेळगाव नग- रच्या भाषणावर फुसका खटला रचून त्यांचा जामीन घेऊन किंवा त्यांना बोलण्याची बंदी करून सरकाराने खचित भागविले नसते, तर आपल्या संग्रहातील पुरावा दाखवून त्यांना पुनः ऐनजिनसी शिक्षा मिळण्याच्या खटल्याची भीति घालूनच गप्प केले असते. घरावरचा पाहारा उठणे याचा अत्याचाराविषयक मताशी काही एक संबंध नव्हता. आणि टिळकांचा वेगळा काही हेतु नसता तर त्यानी या पाहायाला मुळीच भीक घातली नसती. जे लोक त्याना भेटणारे नाहीत ते पाहारा नसता तरी येऊन भेटले नसते, व जे भेटणारे होते किंवा भेटावयास पाहिजे होते ते या नाही तर त्या मार्गाने त्याना भेटल्याशिवाय कधीहि राहिले नसते. शिवाय पाहारा ठेवल्याने स्वतः त्यांना काहीच जाच नव्हता व इतरानाहि किती जाच होऊ शकेल याच्या मर्यादा त्याना चांगल्या कळत होत्या. अत्याचाराविरुद्ध मत प्रगट केले म्हणून सरकार दरबारी त्यांची अशी कोणती घडी बसावयाची होती किंवा राजकारणात तरी त्याना असा कोणता फायदा व्हावयाचा होता ? कारण ते अत्याचाराना उत्तेजन देणारे नसले तरी राजद्रोही तर खरेच. एकदा सोडून दोनदा राजद्रोही. आणि राजद्रोही असणे ही सरकाराशी वाकडेपणाची अप्रीतीची पराकाष्ठाच होय. अत्याचाराविरुद्ध मत प्रगट केल्याने राजद्रोहीपणाचा त्यांच्यावरचा छाप कसा निघून गेला असता ? कित्येकाना असे वाटते की पुढे चिरोलसाहेबावर टिळकाना फिर्याद करावयाची होती आणि आपली वेअब्रू साफ करून घ्यावयाची होती म्हणून अत्याचाराविरुद्ध हा जाहीरनामा काढून त्यानी पुराव्याची पूर्व तयारी केली. याहि म्हणण्यात अर्थ नाही. या जाहीरनाम्यात चिरोलसाहेबांच्या पुस्तकाचा उल्लेख आहे ही गोष्ट खरी. तथापि बेअब्रूची फिर्याद लावण्याचा त्यांचा यावेळी पक्का निश्चय झाला होता असे म्हणण्याला आधार नाही. शिवाय न्यायकोर्टात कोणतीहि कबुली ती कबुली देणान्याच्या हिता- विरुद्ध असेल तरच पुराव्यात ग्राह्य होते हे कायद्याचे तत्त्व टिळकासारख्या कायदेपंडिताला माहित नसेल असे संभवत नाही. चिरोलसाहेबांचा सगळा भर रँडचा खून व जॅक्सनचा खून या प्रकरणी जे कागदपत्र उपलब्ध होते त्यावर होता व तो १९१४ साली टिळकानी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील एखाद्या सात्त्विक मताने नाहीसा थोडाच होणार होता ? अत्याचाराविरुद्ध मत प्रगट केल्याने अत्याचारी लोकांची एक प्रकारे गर्भित निंदा होते. म्हणून टिळकांनी जर कोणाला खरोखरच प्रत्यक्ष चिथावून टि० उ...४५