पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ वृत्तीला क्षणभरच उज्ज्वल करून उपशम पावणारे आहेत म्हणून त्यांचा नित्यां- चार होऊ शकत नाही, असेच टिळकांचे मत होते. वर्तमानपत्रे चालविण्या- संबंधाच्या धोरणासंबंधानेहि त्यांचे असेच मत असे. यामुळे धर्मप्रवृत्तीविषयी त्याना कौतुक व आदर असून तिचे प्रसंगविशेषी ते समर्थन करीत, तरी आपल्या वर्तमानपत्राना निव्वळ सात्विक व धार्मिक असे स्वरूप त्यानी ठेवले नाही. तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे निःस्वार्थी हुतात्म्याविषयी त्यानी प्रसंगविशेषी जरी सहा- नुभूति व कौतुक प्रगट केले तरी आपल्या पत्रातून त्या गोष्टींचे प्रमाणाबाहेर समर्थन केले नाही. वर्तमानपत्र हे राजकारणाच्या नित्य व्यवहाराचे साधन असे ते मानीत असल्यामुळे मंडालेहून केळकराना त्यानी लिहिलेल्या एका खाजगी पत्रात वर्तमानपत्राला ताजव्याची उपमा दिली आहे. ते म्हणतात:- A newspaper must be like a good balance stable and sensitive at the same time." राष्ट्रात कोणतीहि नवी व तेजस्वी भावना उत्पन्न झाली असता तिचा परामर्ष अवश्य घ्यावा व तिचा फायदा आपल्या द्वारे जनतेला मिळवून द्यावा. पण त्या भावनेत श्रेयस्करपणाचे थोडेसे तच्च आहे म्हणून सर्वस्वी त्याच भावनेत वर्तमान- पत्राने गुरफटून जाऊ नये. चांगल्या वाजव्यात एका बाजूला लहानसे वजन पडले तरी त्याने त्या बाजूला काटा झुकता दाखविलाच पाहिजे. पण ते क्षणिक वजन पारड्यातून निघून जाताच त्याने आपला काटा फिरून मध्य बिंदूवर आणून ठेवला पाहिजे. म्हणजे मूळची स्थिर स्थिति पुनः स्थापित केली पाहिजे. पारड्यात एकदा वजन पडले पण ते निघाले तरी ज्याचा काटा ढळलेलाच राहतो तो ताजवा चांगला नव्हे. त्याचप्रमाणे वजन एका पारड्यात कितीहि घातले तरी ज्याचा काटा तिकडे ढळत नाही, नुसता मध्यबिंदुच धरून राहतो, तोहि ताजवा तोलण्याच्या कामाला निरूपयोगी समजावा. स्वार्थत्यागी किंवा हुतात्मे या लोकांच्या देशभक्तीचा गुण घेणे किंवा त्यांचे कौतुक करणे ही गोष्ट टिळकांच्या मनाला पटत असल्याने, व त्याहिपेक्षा वर्तमान- पत्रात लिहिण्याचा नित्य प्रसंग त्याना असल्याने, अत्याचारासंबंधाने त्यांच्या खऱ्या मताचा गैरसमज व विपर्यासहि झाला आहे. या गोष्टीला आमच्या मते तीन गमके आहेत. पहिले गमक टिळकानी मंडालेहून आल्यानंतर जो जाहीरनामा काढला त्यात अत्याचाराच्या विरुद्ध आपले मत प्रगट केले आहे. कित्येक लोकाना असे वाटते की अत्याचाराना उत्तेजन दिल्याबद्दल टिळकाना शिक्षा झाली म्हणून तुरुंगवासाला भिऊन सरकाराला खूष करण्याकरिता आणि आपल्या घरावरील पाहारा उठविण्याकरिता त्यानी तसे मत प्रगट केले. पण या म्हणण्यात स्वारस्य नाही. भरपूर सहा वर्षे कैद भोगून परत आल्यावर त्याना भिण्यांचे कारण काय उरले होते १ १९०८ पासून त्यांच्या गैरहजेरीत जे अनेक अत्याचार झाले त्यात त्यांचा संबंध कोणी ओढून ताणून आणू म्हटले तरी न येण्यासारखा बंदोबस्तं त्यांच्या तुरुंगवासाने केलेलाच होता. म्हणून अत्याचाराविरुद्ध मत प्रगट करून