पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळक व अत्याचार ४७ रीतीने करावयास लागतात. या विवेचनात टिळकांच्या राजकारणातील मार्गाचे व नित्य नैमित्तिक आचरणाचे मर्म आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अणे यांच्याशी बोलताना त्यानी या तीन मार्गातील ठळक व परिचित लोकांची उदा- हरणे तेव्हां दिली असतील की नाही हे सांगता येत नाही. परंतु त्यांच्या मनापुढे त्यावेळी तशी ठळक नावे असावी असे आम्हाला वाटते. पहिल्या मार्गाचे उदाह- रण अण्णासाहेब पटवर्धन, दुसऱ्या मार्गाचे उदाहरण चाफेकर धिंग्रा सावरकर वगैरे लोक, व तिसऱ्या मार्गाचे उदाहरण स्वतः टिळक अशीच नावे त्यांच्या डोळ्यापुढे त्यावेळी असावी. या तीनहि मागीतील लोकांची देशभक्ति एकसार- खीच गाढ व तीक्ष्ण परंतु केवळ स्वभावभेदामुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले. अण्णासाहेब पटवर्धन हे साधुत्वाच्या मार्गाला लागले त्यांचे कारण देशाविषयी निराश होताच त्यांची सत्त्ववृत्ति इतकी उत्कट दशेला पोचली की ते धर्माचार हेच आपले कर्म असे स्वीकारून ईश्वरकृपा संपादनाच्या उद्योगाला लागले. चाफेकर धिंग्रा वगैरेनी त्याच उत्कट स्थितीत तामसी वृत्तीला वश होऊन त्यानी अत्या- चारी कृत्यात उडी घेतली व सावरकरानीहि त्याच उत्कट तामसी वृत्तीने अत्याचारी लोकाना मदत केली व त्यांचे समर्थन केले. टिळकांमध्ये ही सात्त्विक किंवा हीं तामसी वृत्ति इतक्या उत्कट स्थितीला कधीच पोचली नाही. सत्व रज व तम हे तिन्ही गुण त्यांच्यामध्ये प्रमाणबद्ध असून त्याना ते नेहमी व्यवहारोन्मुख अशाच स्थितीत ठेवीत. म्हणजे काही निमित्ताने त्यांच्यामध्ये साविक गुण क्षणभर विशेष उत्कट झाला तरी तो टिकत नसे व पुनः ते रजोगुणी बनत. उलट त्याच रीतीने त्यांच्यामध्ये कित्येक वेळा तामसी वृत्ति क्षणभर उत्कट झाली तरी तो क्षण जाताच ते पुनः रजोगुणी बनत. अशा रीतीने व्यवहारात्मक रजो- गुणाची त्यांची भूमिका कधीहि क्षणमात्रापलीकडे ढळलीच नाही. म्हणून ते नित्य व्यवहाराला योग्य ठरले व नित्य व्यवहारच त्यानी केला. आणि सद्यःप्राप्त साधनानीच प्रस्तुत संकटे निवारण करण्याचा प्रयत्न केला. पण रजोगुण हा स्थितिस्थापक स्वरूपाचा असल्यामुळे त्याची भूमिका दृढमूल असते. आणि ती सहसा ढळत नाही. आणि जगातले व्यवहारहि मुख्यतः रजोगुणानेच पार पडत असल्यामुळे इतर दोन गुणांची मनुष्येहि अखेर या मध्यम वृत्तीलाच मान देतात. अण्णासाहेब पटवर्धन हे धर्ममार्गीय असले तरी टिळकानी उचललेला नित्य व्यवहार हाच टिकाऊ व अंतिम फलदायी असे वाटून ते त्यांच्या राज- कारणात सहकारिता करीत. उलट सावरकर बगैरे लोकानाहि आपल्या क्षणिक वृत्ती ओसरल्यावर टिळकांचा धोपट पण चिरस्थायी मार्ग हाच युक्त वाहून त्यानीहि शेवटी टिळकांच्या राजकारणातील नित्य व्यवसायाचे व त्यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या राजकीय सुधारणांचे समर्थन केले. टिळकांची दृष्टि नैमित्तिकापेक्षा नित्यावर अधिक असे. प्राप्तकर्म व सद्यः फल याच त्याना मुख्य अशा गोष्टी वाटत. आणि साधुत्वाचे मार्ग व अत्याचाराचे मार्ग हे कौतुकास्पद असले तरी