पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लो. टिळकांचे चरित्र भाग ८ लाहि लागू. पण सर्वस्व देण्यास तयार नाही म्हणून हळहळ वाटणे किंवा बोलून दाखविणे हे जसे चूक नाही, तसेच आपल्या हातून देशभक्तिप्रेरित अत्याचार होत नाही म्हणून दुसऱ्या कोणी तो केला तर त्याबद्दल कौतुक वाटणे किंवा बोलून दाखविणे हेहि चूक नाही. याचे तात्त्विक समर्थन दुसरेहि असे आहे की जो तो आपल्या कर्माचा पनि असल्यामुळे आपल्या कर्माचे सुख किंवा दुःख भोगतो. त्यात आपला संबंध नसला तर आपल्यावर जबाबदारीहि नाही. कौतुक करणे हे फक्त एक प्रकारचे मत व्यक्त करण्यासारखे आहे. समजा लोकपक्षाकडील एखाद्या मनुष्याचा सरकारी मनुष्याने घात केला, आणि ज्याचा घात झाला तो सरकार- च्या दृष्टीने वाईट मनुष्य होता व शिक्षेला योग्य होता असे कोणा अधिका-यास वाटले, तर तो त्या घाती मनुष्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही पण स्वतः मात्र तो घात करण्याला प्रवृत्त होणार नाही. जनरल डावर याने गोळीबार करून पुष्कळ लोकांचे प्राण घेतले त्याचे ओड्वायर साहेबानी आपल्या पुस्तकात उघड उघड समर्थन केले आहे. व जनरल डायर याने आपले कर्तव्य तेच केले असे म्हणून त्याचे एकप्रकारे कौतुकच केले की नाही ? पण डायरच्या जागी ओड्वायर असते तर त्यानीहि तेच केले असते असे आम्हास म्हणवत नाही व वाटतहि नाही. बाजू सरकारची असली म्हणून अशा घातकी मनुष्याचे कौतुक करणे हे जितके समर्थनीय ठरेल तितकेच जनतेची बाजू म्हणून अत्या- चारी मनुष्याचेहि कौतुक करणे योग्य ठरेल. यासंबंधाने टिळकानी माधवराव अणे यांच्याशी एकदा जी तात्त्विक चर्चा केली ती लक्षात ठेवण्यासारखी आहे. ते म्हणाले "परोपकारी वृत्ति ही निरनिराळ्या प्रकृतीच्या मानाने निरंनिराळ्या रूपाने प्रगट होत असते. परोपकारी वृत्तीच्या मनुष्याने देशाच्या सांप्रतच्या विपन्नावस्थेचा विचार करावयास सुरवात केली तर त्याच्या प्रकृतिमानाप्रमाणे तो तीन मार्गांपैकी एका मार्गाचा स्वीकार करतो. दया करुणा श्रद्धा इत्यादि गुण ज्याचे ठिकाणी निसर्गतः विशेषत्वाने वास करितात व प्रापंचिक सुखाविषयी जो स्वभावतः उदासीन असतो तो साधुत्वाच्या मार्गास लागतो व देशावरील संकटपरिहारार्थ परमेश्वरी कृपेची याचना करतो. ज्यांच्या स्वभावात मूळचीच तामसी वृत्ती अधिक व क्रोधादिकांचा आविर्भाव विशेष असे लोक अराजक मार्गाने व अत्याचारी कृतीने आपला कार्यभाग साधण्याचे उद्योगास लागतात. परंतु ज्यांच्या ठिकाणी सर्वच वृत्ती काही प्रमाणबद्ध अतएव व्यवहारसन्मुख स्थितीत असतात अशी माणसे सद्यः प्राप्त साधनानींच प्रस्तुत संकट निवारण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांचा हेतु एकच असल्यामुळे या मध्यम मार्गांने जाणाऱ्या माणसावर दोन्ही बाजूच्या प्रमुख व्यक्तीचा प्रसंगविशेषी रोष होतो. परंतु कार्याची गति जशी वेगवान होत जाते तशी सर्वाचीच आक्रमणकक्षाहि कमी कमी दूर होत जाते. व एक काळ असा येतो की या तीनहि मार्गांचे लोक मध्यम मार्गाला प्रामुख्य देऊन त्याच्याच आश्रयाने व नेतृत्वाखाली आपापले उद्योग त्या मागीला पोषक होतील अशा