पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ टिळक व अत्याचार ४५ आश्चर्य नाही. पण पुरावा हवा तसा मिळाला नाही. मिळाला त्यावर विश्वास बसला नाही. कबूली जबाब पुष्कळ वेळा खोटे होते व काही पोलिसापुढे झाल्या- मुळे जुलमाने दिले होते. खटले फार लांबत.” वगैरे कारणामुळे आणखी नवीन दडपशाहीचे कायदे करावे लागतील अशी शिफारस करून कमिटीने रिपोर्ट संघ- विला आहे. (६) टिळक व अत्याचार अत्याचारी लोक हे जिवावर उदार होतात याविषयी टिळकाना मनातून खरोखर कौतुक वाटे. पण आपल्या देशातील अत्याचारी लोकांचेचसे काय, निःस्वार्थीपणाने कोणीहि आत्माहुति दिली असे आपण एखाद्या युद्धासंबंधाने किंवा परदेशातील घातपातासंबंधाने वाचले ऐकले, तर कोणाचीहि मनोवृत्ति अशीच कौतुकाची होईल. त्यातूनहि अशा लोकानी आपल्या देशाकरिता आत्मा- हुति दिली असे मनाला पटल्यावर त्याच्याबद्दल कोणाला कौतुक वाटणार नाही ? मग ते तो बोलून दाखवो वा न दाखवो. अत्याचाराला कोणाला मुद्दाम प्रवृत्त करणे ही गोष्ट वेगळी आणि त्याचे कौतुक वाटणे किंवा बोलून दाखविणे ही गोष्ट वेगळी. रँडसाहेबांचा खून झाला आणि तो प्लेगच्या जुलमाच्या त्रासामुळेच झाला ही गोष्ट ज्या नेमस्ताना पटली त्यानीहि खुनी मनुष्याचे मनांतून कौतुकच केले असेल, त्याचे कौतुक याचा अर्थ व्यक्तिशः रँडसाहेबांचा द्वेष नव्हे, तर हा मनुष्य आपले प्राण जाण्यासारखे कृत्य करून लोकांच्या रागाचा त्याने उपशम केला आणि ही गोष्ट निःस्वार्थीपणाने केली इतक्याबद्दलन्त्र न्यायबुद्धीने त्याचा योग्य तो गुण घेणे. असा उघड गुण घेतला म्हणजे सरकारला वाईट वाटणार ही गोष्ट खरी. एवढेच काय, पण स्वतः गुण घेणाऱ्यालाहि दुसरा मनुष्य प्राणाला मुकतो याचे वाईटच वाटते. तरीपण जनतेचा जो वैरी तो आपलाहि वैरी असेहि थोडेबहुत वाटल्याशिवाय राहात नाही. पण मग प्रश्न असा येतो की जर अशा अत्याचारी मनुष्याचे तुम्ही गुण घेणार तर असा अत्याचार तुम्ही स्वतः हि का करीत नाही ? त्यावर उत्तर इतकेच की आमचा स्वभाव तसा नाही. वाटेल तर धैर्य आमच्यामध्ये नाही असेहि म्हणा. पण तसा स्वभाव मुद्दाम आणू म्हणून येत नाही आणि तसा स्वभाव किंवा ते धैर्य असल्याशिवाय तसले कृत्यदि कोणाच्या हातून होत नाही. कोणच्याहि सहानुभूतीच्या भावनेला अशीच मर्यादा असते. एखाद्याला दुःख झाले तर आपण हळहळतो ही गोष्ट खरी. पण ते दुःख कदाचित् द्रव्यदानाने भरून येणारे आहे असे कोणी पाहिले आणि आपल्याला म्हटले की 'कायहो तुम्ही हळहळता तर तुमच्याजवळचे सर्व द्रव्य त्याला देऊन त्याचे बरे कां करीत नाही व आपली हळहळ वाचवीत नाही?' तर त्याला उत्तर हेच की हळहळ वाटली म्हणून स्वार्थत्यागाची उडी कोठपर्यंत जाईल याला मर्यादा आहेच. व जी गोष्ठ दुःखी मनुष्याच्या हळहळीला लागू तीच निःस्वार्थी शूर हुतात्म्याच्या कौतुका-