पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ १९०९ साली लंडनमध्ये कर्झन वायली यांचा खून मदनलाल धिंग्रा याने केला. त्याच साली जूनमध्ये गणेश दामोदर सावरकर यांच्यावर खटला झाला. डिसें- बरात जॅक्सन साहेबांचा नाशकास खून झाला. ग्वालेर येथे नवभारत नावाची गुप्त मंडळी स्थापण्यात आली. अमदाबाद येथे लॉर्ड मिंटो यांच्या मिरवणुकीच्या वाटेवर बाँब ठेवण्यात आले. १९१० साली सातारा जिल्ह्यात गुप्त मंडळीचा कट झाला. १९१४ साली पुण्यात काही राजद्रोहकारक छापील मजकूर व बाँबचे लेखी फार्म्युले सांपडले. या सर्व गोष्टी एकत्र जमेला धरून कमिटीने असा निष्कर्ष काढला की "यातील बहुतेक गुन्हेगार चित्पावन ब्राह्मण होते. चाफेकर बंधू हे स्वराज्यवादी नव्हते पण इंग्रजद्रोही कट्टे पुराणमतवादी होते. सावरकर तर बोलून चालून क्रांतिकारक होते. या सर्व चळवळीचे एक जाळे होते आणि कोळी जसा आपल्या तंतुजालाच्या मध्यभागी बसून हालचाली करतो त्याप्रमाणे टिळक हे या सर्वांच्या मुळाशी असून या सर्व चळवळीला उत्तेजन देत होते" ! पण १९१४ सालापर्यंत गोष्ट आणून भिडविल्यावर, त्या साली टिळकानी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला व अत्याचारी चळवळीचा निषेध केला ही गोष्टहि जगजाहीर असल्यामुळे, तिचा उल्लेख केल्याशिवाय कमिटीला गत्यंतर नव्हते. म्हणून पहिल्या म्हणजे महाराष्ट्र प्रकरणाच्या शेवटी तो उल्लेख कामाटीने केला आहे. पण तो केवळ उल्लेखच आहे. कमिटीने त्यावर कोणत्याहि प्रकारची टीका केली नाही हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे. यानंतर कमिटीने आपल्या रिपोर्टात प्रथम बंगाल नंतर बहार ओरिसा वायव्य प्रांत मध्यप्रांत पंजाब मद्रास ब्रह्मदेश आणि जर्मन चिथावणीने झालेले कट या सर्वाचे परीक्षण क्रमाने केले आहे. आणि शेवटी निष्कर्ष म्हणून लिहिला आहे तो असा की बंगाल्यातील अत्याचारी चळवळे ब्राह्मण नव्हते पण सुशिक्षित होते. त्यांची चळवळ मोठी पद्धतशीर कल्पक चतुराईची आणि सतत चाललेली होती. आणि तीत दरोडे व खून पुष्कळ झाले. पंजाब व ब्रह्मदेश खेरीज करून इतर प्रांतात ही चळवळ मुळीच रुजली नाही व दंगे किंवा इतर गुन्हे अगदी तुरळक झाले. पण या प्रांतातील हे लोक ब्राह्मण अब्राह्मण सुशिक्षित अशिक्षित कोण कसे • होते याचे वर्णन किंवा काही सिद्धांत कमिटीने दिला नाही. पंजाब व ब्रह्मदेश या प्रांतात चळवळ झाली ती अमेरिकेहून आलेल्या बंडखोर शीखानी केली. पण या चळवळीत अर्थात कोणी ब्राह्मण नव्हते. व सुशिक्षितहि नव्हते. मुसलमान लोकांचीहि चळवळ अगदीच थोड्या व धर्मवेड्या लोकांची होती. कमिटी म्हणते " या सर्व चळवळीचा हेतु बंड करून इंग्रजाना हिंदुस्थानातून घालवून देण्याचा होता. पण चळवळीतील निरनिराळ्या प्रांताच्या लोकांचा परस्पर संबंध होताच असे नाही. काही ठिकाणी देशाच्या बाहेरून म्हणजे जर्मनीहूनहि चिथावणी आली. ही सर्व चळवळ राजनिष्ठ जनतेच्या साहाय्याने हाणून पाडता आली. सरकाराला त्याकरिता वेळोवेळी असामान्य असे कायदे करावे लागले यात काही