पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ रौलेट कमिटीचा रिपोर्ट ४३ उल्लेखाने रिपोर्टाची सुरवात झाली प्रसिद्ध आहे आणि द्रविड बंधूंचा मुळीच नाही. पैशाच्या बक्षिसाच्या चळवळ आपण मानतो तसे स्वरूप काहीच नव्हते. नंतर १८९७ साली रँडसाहे- बांचा खून झाला त्याला राजकीय हेतू होता असे म्हटले तरी शिवाजी व गण- पती उत्सव सुरू झाले नसते तरी तो खून झाला असता इतके दुःसह दुःख पुणेकराना रॅन्डशाहीचे झाले. पण रौलेट कमिटीत इतका सूक्ष्म विचार करणारा एकहि सभासद नव्हता. पोलीस खात्याच्या सर्व प्रांतिक रिपोर्टीतून निरनिराळे उतारे काढून त्याचा एक भला मोठा गठा या कमिटीपुढे ठेवण्यात आला व त्याची वर्गवारी करून ठाकठीकपणाचे स्वरूप देऊन कमिटीने आपला रिपोर्ट लिहिला. याहून अधिक संशोधन असे तिने केले नाही. खरा कार्यकारण भाव पाहिला नाही, आणि मानसशास्त्रदृष्टीने जी पृच्छा करावी तीहि केली नाही. रॅन्ड व द्रविड बंधु यांच्या खुनांच्या आहे. पण रॅन्डचा खून कशामुळे झाला खून हा क्रांतिकारक चळवळीचा पुरावा लोभाने चहाडी करणे आणि चहाडखोराचे पारिपत्य होणे या गोष्टी एरवीहि किति- तरी होतात. "रॅन्डच्या खुनानंतर टिळकांवर खटला झाला व टिळकाना शिक्षा झाली तरी त्यांच्या अभावी केसरी मराठा पत्राचे धोरण बदलले नाही. १८९९ साली काळकर्ते परांजपे याना सावधगिरीची सूचना दिली. १९००, १९०४, १९०५,१९०७ या साली काळकर्त्यावर खटला भरण्याचा सरकारचा विचार होता व शेवटी १९०८ साली तो प्रत्यक्ष भरण्यात आला. १९०६, १९०७, व १९०८ या साली विहारी पत्राच्या संपादकावर खटले होऊन तीन संपादक ओळीने तुरुंगात गेले." वरील उदाहरणात खटले तरी झाले होते व इकडची तिकडची चार वाक्ये काढून ती खोटी किंवा तामसी किंवा सरकारची निंदा करणारी असे काही दाखविता तरी येऊ शकले. पण नातुबंधूना चौकशीशिवाय सरकाराने कैदेत ठेवले ही गोष्टहि क्रांतिकारक चळवळीचा पुरावा म्हणून कमिटीने उल्ले- खिली हे पाहून कोणाला आश्चर्य वाटणार नाही ? सरकाराने घडधडीत अन्यायाची व असमर्थनीय कृत्ये केली तीच लोकांच्या चळवळीचा पुरावा म्हणून कशी देता येतात ? सरकारला उगीच भीति वाटून किंवा खोटा संशय येऊन त्यानी उचलून एकाद्याला तुरुंगात टाकले तर ही स्थिति व हा संशय लोकाविरुद्ध पुरावाच काय? ● यानंतर रिपोर्टात कमिटीने शामजी कृष्णवर्मा त्यांचे इंडिया हौस इंडिअन सोशिओलॉजिस्ट हे पत्र आणि प्रतापसिंह शिवाजी इत्यादिकांच्या नावाने ठेव- लेल्या शिष्यवृत्त्या यांचा उल्लेख आहे. कृष्णवर्मा यांच्या बोर्डिगात ही शिष्यवृत्ति घेऊन राहिलेल्या सावरकरांचा सबंध सहजच येतो. आणि सावरकरांचा व टिळ कांचा संबंध मित्रमेळ्याच्या द्वारे आल्याचे रिपोर्टात लिहिले आहे. पण मेळ्यात खासगी गुस पोलिस शिरला असताहि, व टिळकानी तेथे मेळ्याला काय उपदेश खरोखर केला हे प्रसिद्ध झाले असताहि, त्याचा मात्र उल्लेख रिपोर्टात नाही . विलायतेत १९०८ साली हिंदी विद्यार्थी बाँबच्या गोष्टी उघडपणे बोलू लागून