पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ संपले असे त्याना वाटल्यामुळेच त्या साली त्यानी या चळवळीचा एकंदर आढावा घेण्याकरिता शैलेट कमिटी नेमली. तिचा रिपोर्ट १९१८ साली झाला. स्यानंतर कुप्रसिद्ध 'रौलेट अॅक्ट' नावाचे कायदे करण्यात आले. खरे पाहिले तर ते तेव्हा अनवश्यक होते व सरकारालाहि ते अनवश्यक असेच वाटत असावे. परंतु पुष्कळसा कापूस पिंजून ठेवल्यावर त्यातून थोडेसे तरी सूत काढावे अशी बुद्धि होते त्या- प्रमाणे रौलेट कमिटीच्या संशोधनातून निघणान्या सिद्धांतांचा काही सक्रिय उपयोग न केला तर ते संशोधन फुकट झाले अशा बुद्धीनेच रौलेट कायदे घडविण्याचा सरकाराने आग्रह धरला. रौलेट कमिटीच्या या रिपोर्टात एकंदर क्रांति- कारक चळवळीचे संशोधन व वर्णन दिलेले आहे. त्याचा सारांश पुष्कळाना विदि- तच आहे. तथापि ही चळवळ व टिळक यांचा लोकांच्या मनात आणि सरकारच्या मनात काही संबंध आहे म्हणून तितक्यापुरता त्याचा उल्लेख थोडासा येथे करतो. प्रथम ही गोष्ट सांगितली पाहिजे को या चळवळीचे सर्व श्रेय रौलेट कमिटीने पुण्याच्या ब्राह्मणाकडे दिलेले आहे. उद्या इतिहासात पुण्याच्या ब्राह्मणांचा हा एक बहुमानच ठरेल. परंतु या मानातील यथान्याय जितका अंश पुण्यातील ब्राह्मणाकडे येऊ शकेल तितकाच त्यानी घ्यावा, आणि रौलेट कमिटीच्या रिपोर्टात केवळ ऐतिहासिक न्यायबुद्धीनेहि काकपद लिहून जरूर तो शोध घालावा हे योग्य असल्यामुळे तसे करणे आम्हाला प्राप्त आहे. रौलेट कमिटीच्या रिपोर्टाच्या प्रस्तावनेत प्रारंभ हिंदुशास्त्रातील राजधर्माच्या उपपत्तिपासून केला आहे. आणि संशोधनाची ही गाडी तेथून जी निघाली ती वाटेत ईस्ट इंडिया कंपनी, मुसलमानी रियासत, शिवाजी महाराजांचे हिंदवी राज्य, व पेशवे या स्टेशना- वरून अखेर पुणे जिल्ह्यातील चित्पावन ब्राह्मणांच्या घरापाशी येऊन ती बोरीबंदरावर कायमची थांबावी त्याप्रमाणे थांबली आहे. पुढे रिपोटीत बंगाल्या- सुद्धा सर्व प्रांतातील क्रांतिकारक व अत्याचारी चळवळीचा परामर्ष कमिटीने घेतला असला तरी प्रस्तावनेत इतर कोणत्यादि प्रांतातील लोकांचा उल्लेख केला नसून ब्राह्मण, चित्पावन ब्राहाण, आणि पुणे जिल्ह्यातील चित्पावन ब्राह्मण, या क्रमाने या चळवळीचे कर्तृत्व पुण्याकडे आणून ठेवले आहे. कमिटीने दिलेला हा मान नाकारण्याची पुण्याच्या ब्राह्मणांची इच्छा नाही. तथापि बंगाल वगैरे इतर प्रांतातील पुढाऱ्याना यामुळे थोडासा अन्याय होतो इतकेच आम्ही म्हणतो. याचे कारण असे की पुण्यातील गणपती व शिवाजी उत्सवाना या चळवळीत उगमस्थानाचे महत्त्व कमिटीने दिले असले तरी अशा स्थूल राष्ट्रीय बुद्धीचे उद्योग महाराष्ट्राप्रमाणे इतर प्रांतातहि होत नव्हते असे नाही. पुणे शहरात गणपति उत्सवात झालेला दंगा आणि रायगडावरील शिवसमाधीच्या जिर्णोद्धाराची चळवळ या गोष्टी महाराष्ट्राला खऱ्या स्वरूपाने विदित आहेत. समाधीच्या दुरु- स्तीची चळवळ ही महाराष्ट्राला भूषणभूत होती व पुण्यातील गणपत्युत्सवात झालेला दंगा हा मामुली स्वरूपाचाच होता. पण त्या दोहोतहि जिला क्रांतिकारक