पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ रौलेट कमिटीचा रिपोर्ट ४१ लागले हे म्हणणे अधिक शोभेल-व काळेपाण्याची शिक्षा झालेले लोक आयरिश देशभक्त गॅव्हिन डफी यांच्याप्रमाणे साम्राज्यातील प्रधानमंडळाची प्रधानकी करू लागले. इतकेच नव्हे तर अशा लोकांच्या सांनिध्याने किंवा समावेशाने राष्ट्रीय सभेला भूषणच येते अशी समजूत होऊ लागली आहे. कारण आता तुरुंगात गेले कोण असा प्रश्न नसून जाण्याचे राहिले कोण ? सुटले कोण ? चुकले कोण ? असेच प्रश्न खाजगी रीतीने विचारण्यात येऊ लागले आहेत ! (५) रौलेट कमिटीचा रिपोर्ट सन १९०६ साली जी क्रांतिकारक चळवळ सुरू झाली ती पुढे बरेच दिवस चालू होती. काही दिवस ती विशेष तीव्र असून तिजमध्ये अत्याचारहि घडले. काही दिवस तिचे स्वरूप सौम्य होते तरीहि त्या काळी परकी राजसत्तेचा निषेध जोराने सुरू होता. शेवटी शेवटी हे अत्याचार थांबले. निषेधप्रदर्शनहि कमी झाले. परंतु हिंदुस्थानातील एकंदर वातावरणच स्वातंत्र्यबुद्धीने इतके भरून गेले आणि ही बुद्धि सरकारच्याहि इतकी पचनी पडली की साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे जुन्या राष्ट्रीय सभेच्या उद्देशविधानातील शब्द काढून टाकून स्वराज्य हा एकच मोघम शब्द त्याऐवजी घालण्यात आला. तरी सरकाराने काही पारिपत्य केले नाही. समित्यांचा कायदा जिवंत असताहि राष्ट्रीय सभा त्यामुळे राजद्रोही संस्था ठरविण्यात आली नाही. आणि आम्हाला स्वराज्य हवे, मिळेल तर ते साम्राज्यात हवे पण तेथे ते न मिळेल तर साम्राज्याबाहेरहि चालेल, असे लोक सरसकट बोलत व लिहीत. पण त्याकरिता कोणावर विशेष खटलेहि करण्यात आले नाहीत. ही क्रांतिकारक चळवळ १९१९च्या बादशाही जाहीरनाम्याने व सुधार- णाच्या कायद्याने थोडीबहुत मऊ पडली परंतु ती अद्यापि लुप्त झालेली नाही व कायमची लुप्त होणारहि नाही. तिचे उद्योग वर्षातील ऋतुमान बदलावे त्या प्रकाराने केव्हा स्पष्ट तर केव्हा अस्पष्ट केव्हा गरम तर केव्हा नरम असे बदलतात ही गोष्ट खरी. तथापि स्वराज्य मागण्याला आता कायदेशीर स्वरूप आले आहे. आणि स्वराज्याच्या मागणीच्या योजनाहि व्यापक व विस्तृत होऊन त्या सर- काराने मान्य केल्या नसल्या तरी त्यांचा बेकायदेशीरपणा नाहीसा झाला आहे. अजूनहि इकडे तिकडे कोठे बाँबचे नाव ऐकू येते. एखादा बाँब दृष्टीस पडतो. एकादा भ्रामक ठरतो. एकादा उडतो. एकादा खटला होतो. धरपकडही होते. आणि अजूनहि बिनचौकशीने काही राजकीय कैदी तुरुंगात किंवा नजरकैदेत आहेत. तथापि एका बाजूने सुधारणांच्या विधायक कार्यक्रमाला अल्पसा का होईना प्रारंभ झाल्यामुळे, आणि दुसऱ्या बाजूने गांधी यानी अनत्याचारी वर्तनाचा उपदेश जोराने फैलाविल्यामुळे अत्याचाराची कर्मे बहुतेक नाहीशी झाली आहेत व क्रांतिकारक चळवळ म्हणून उरली असली तरी तिचे स्वरूप बरेचसे सात्त्विक होऊन राहिले आहे. सरकारच्या दृष्टीनोई क्रांतिकारक चळवळीचे तीव्र स्वरूप १९१७ साली