पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ८ तेव्हा आता सरकार बाटावयाचे काय उरले ? दी गोष्ट इतकी रूढ होऊन बसली होती की या गाठी भेटी झाल्याबद्दल विलायतेतील किंवा इकडील पत्रानी एक चकार शब्दद्दि काढला नाही. १९ व्या शतकाच्या मध्यभागी आयर्लंडचे पुढारी डॅनिअल ओकोनेल हे टिळकांसारखेच लोकांचे पुढारी होते. आणि टिळकाइतकेच ते इंग्रजाना अप्रिय होते. पण हिंदुस्थानचे राजकारण १९१९ साली ज्या थराला आले होते त्या थराला आयरिश राजकारण तेव्हा पोचले नव्हते. म्हणून आयर्लंडचे व्हाइसरॉय लॉर्ड मलग्रेव्ह यानी ओकोनेल याला जेवायला बोलविले या गोष्टीचा लंडन टाइम्स पत्राने मोठा गवगवा केला आणि असे लिहिले की " लॉर्ड मलग्रेव्ह यानी डॅनिअल ओकोनेलसारख्या इंग्रज विद्वेषि च घाण तोंडाच्या आयरिश पुढाऱ्याला प्रत्यक्ष जेवावयाला बोलाविले ही गोष्ट निःसंशय सिद्ध झाली आहे. तेव्हा आता काय म्हणावे ?" पण हेहि दिवस निघून गेले व पुढे आणखी अशीहि वेळ आली की ग्लॅडस्टन व पार्नेल यांची गट्टीच जमावी ! कारण दोघांचेहि काही काळपर्यंत एकच ध्येय होते. आणि याच गोष्टीला उद्देशून लॉर्ड सॅलिस्बरी यानी वर एका ठिकाणी लिहिल्याप्रमाणे ग्लॅड- स्टन साहेबावर निंदेचे कोरडे ओढले. मुख्य प्रधानाच्या योग्यतेच्या माणसाने पार्नेलशी संबंध ठेवणे या पलीकडे अनुचितपणा तो काय राहिला! पण एका वेळच्या मुख्य प्रधानाने निंद्य मानलेली ही गोष्ट दुसऱ्या एका वेळच्या मुख्य प्रधानाने प्रत्यक्ष केली यावरूनच कोणी कोणाशी कसा किती संबंध ठेवावा याच्या कल्पना बदलत चालल्या होत्या हे उघड दिसते. १८९८ साली टिळ- काना राष्ट्रीय सभेत बसू दिले याबद्दल गहजब झाला. आणि कित्येक पत्रानी असे ध्वनित केले की टिळक राष्ट्रीय सभेला जाणार म्हणून त्यांचा संसर्ग चुकविण्या- करिता मेथा वगैरे लोक गेले नाहीत ! या पत्राने दिलेले हे कारण बहुधा खोटे असावे कारण मेथा यांचे मनात असा किंतू आला असता तरी त्यानी तो बाहेर दिसू दिला नसता. शिवाय तो आला असला तरी तो पुढे निघून गेला हे खचित. कारण त्यापुढे झालेल्या दोन तीन राष्ट्रीय सभांची उदाहरणे अशी देता येतील की तीत मेथा टिळक हे राष्ट्रीय सभेत एकाच मंडपात बसले. येऊन जाऊन खुनी लोकापुरता प्रश्न राहिला. पण त्याचाहि प्रश्न आता सोपा झाला आहे. कारण खुनाचा गुन्हा शाबित झाला तरच तो खुनी, तो गुन्हा शावित होऊन तो फाशी गेला तर तो राष्ट्रीय सभा व त्यातील काही सोवळे लोक याना विटाळावयाला येऊच शकत नाही. पण समजा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली व ती भोगून तो परत आला तर आज स्थिति अशी आहे की राष्ट्रीय सभेच्या नियमाप्रमाणे त्याला मजाव नाही. अशा मनुष्याला सभेत का येऊ दिले ? असे म्हणण्याइतके सोवळे लोक आता हिंदुस्थानात कोणी उरलेले नाहीत. राजद्रोहाच्या दोनदोनदा शिक्षा झालेले लोक स्टेट सेक्रेटरीच्या मुलाखती घेऊ लागले - किंबहुना स्टेट सेक्रेटरी अशा लोकांच्या मुलाखती घेऊ