पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयलंडचा दाखला ३९ अत्याचार करतील या म्हणण्याने न्याय करण्याविषयी आम्ही आपले हात मागे घ्यावे काय ? युद्ध पुकारले म्हणजे त्यात असे अत्याचार व्हावयाचेच !" हिंदुस्थानात प्रथम सरकाराकडून निरनिराळ्या वर्गात फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न सुरू झाले. पण त्याना फारसे यश आले नाही. तसेच नवे राज- कारणहि सुरू झाले. निरनिराळ्या वर्गाचे लोक एकत्र येण्याचे प्रसंग उद्भवू लागले. तेव्हा पुढारी लोकांच्या अंगातहि बरीच बूज होती. कॉंग्रेससारख्या सभा घेतल्या तरी जी एकंदर राष्ट्राच्या नावावर विकण्याला तयार होतीं व जीमध्ये प्रवेश करण्याला कोणत्याहि तऱ्हेचा मुळात निर्बंध ठेवलेला नव्हता, अशा ह्या सभेत कोणी यावे कोणी येऊ नये याविषयी प्रथम प्रथम बरीच छाननी होई. नेमस्त वगैरे पुढाऱ्यांचा वाहणा असा असे की राजद्रोहाचा ज्याना दुरूनहि संपर्क झाला असेल अशा लोकानी राष्ट्रीय सभेत येऊ नये. पण मौज ही की अशा सोवळ्या वृत्तीने समेत बसणाऱ्या लोकाना सरकारी अँग्लो इंडिअन पत्रे व सरकारी बगलबच्चे हे सरसकट राजद्रोही म्हणण्याला तयारच होते ! अशा रीतीने अनिष्टदर्शनत्वाचे पेंड वरपासून खालपर्यंत सारखे पोचत होते. सरकारने नेम- स्ताना म्हणावे ' तुम्ही काँग्रेसवाले अनिष्ट. ' काँग्रेसवाल्यानी टिळकांसारख्या जहा लोकाना म्हणावे ' तुम्ही अनिष्ट. ' आणि कदाचित जहाल म्हणविणाऱ्या काही लोकानी त्यांच्यापुढे जाणाऱ्या लोकाना म्हणावे 'तुम्ही अनिष्ट. १८९८ सालीच्या मद्रास राष्ट्रीय सभेला टिळक गेले यात वास्तविक वावगे काय होते ? ते पूर्वी पुष्कळ कॉंग्रेसना हजर असत. पुण्याच्या काँग्रेसचे प्रथम ते सेक्रेटरीच होते. काँग्रेसचे उपांग अशी जी प्रांतिक परिषद तिचेहि ते पूर्वी सेक्रेटरी होते. अशा मनुष्याला राजद्रोहाची शिक्षा झाली तरी त्यानी ती सोसली येथेच तिचा संबंध तुटावयास पाहिजे होता. पण या शिक्षेमुळे डागळलेल्या टिळकानी राष्ट्रीय सभेत जाऊन बसावे की नाही याच्या चर्चेने त्या वेळी कित्येक विचारी लोकांच्या डोक्यात किडे पडले होते. मद्रासच्या सभेला टिळक व गोखले दोघेहि हजर होते. या गोष्टीचा विलायतेतील ग्लोब पत्राला इतका विषाद वाटला की सांगता पुरवत नाही. ते पत्र लिहिते " चळवळे टिळक व गोखले दोघेहि राष्ट्रीय सभेला हजर राहिले. झाले ! यावरून आम्ही राष्ट्रीय सभेपासून काय अपेक्षा करावी हे उघडच दिसते. आम्हाला इतकेच वाईट वाटते की टिळक व गोखले यांच्या- बरोबर दोघे खुनी चाफेकर बन्धू याना काँग्रेसला हजर राहता आले नाही ! यावरून ग्लोबच्या दृष्टीने गोखले टिळक व खुनी चाफेकर बन्धु हे सगळे एका माळेला बसले. म्हणजे असंबद्धतेची ती एक कमालच झाली. पण या टीकेला खरे प्रत्युत्तर पुढे दैवाने दिलेच. आणि ते असे की टिळक हे पुढे राष्ट्रीय सभेत बसू लागले एवढेच नव्हे तर एक वर्षी त्याना काँग्रेसचे अध्यक्षहि निवडण्यात आले आणि सरकार दरबारी काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष या नात्याने टिळकानी का महि केले. स्टेट सेक्रेटरी यानी पुढे एके काळी टिळकांच्या गाठी मुलाखतीहि घेतल्या.