पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ व्यक्त केला. तो म्हणाला. " माझ्या हयातीत पार्लमेंटमध्ये आयझॅक बट याने जी होमरूलची मागणी केली तीच पुढे पार्नेल यानेहि केली. पण आयझॅक बट याची मागणी मी उचलून धरली नाही आणि पार्नेलची उचलून धरली याचे कारण बट हा जरी आयरिश राष्ट्राकरिता म्हणून बोलत होता तरी त्याच्या मागे राष्ट्राचे संगीन लोकमत नव्हते. पण पार्नेलची गोष्ट वेगळी होती. त्याने व त्याच्या अनुयायानी जो निकराचा करारीपणा दाखविला तो पाहिल्यावर ते मागतील ते त्याना देणे योग्य आहे असेच कोणालाहि वाटावे.” राष्ट्राचे हे संगीन लोकमत आयझॅक बटच्या मागे नसण्याचे कारण त्याने अत्याचारी लोकांच्या सहकारितेचे बळ तुच्छ मानले आणि पार्नेलच्या मागे ते असण्याचे कारण त्याने दुरून का होईना पण त्या बळाची अपेक्षा ठेवली व त्याला स्वतंत्रपणाचा योग्य तो मान दिला. फिनिक्स पार्कमधील खून झाल्यानंतर लॉर्ड मोर्ले यांचे स्नेही सर आल्फ्रेड लायल यानी मोर्ले याना रागावून पत्र लिहिले व असा आरोप केला की या "खुनाना भिऊन दडपशाहीचे कायदे तुम्ही मागे घेतले व आयरिश होमरूलचे पाऊल पुढे टाकविले, पण तुमच्या हे लक्षात येत नाही की इंग्लंडच्या शेजारी झालेल्या खुनाना अशा प्रकारे उत्तेजन मिळाल्याने हिंदुस्थानातील लोकानाही असे वाटू लागेल की असल्या दडपशाहीने सरकार भिते." अर्थात आरोप नेहमीचेच होते. आणि त्याला मोर्ले यानी उत्तर दिले तेहि लक्षात ठेवण्यासारखे आहे. "कोणत्याहि देशातील सरकारला अत्याचार थांबविता येणे शक्य नसते. रशियन लोकाना निहिलिस्ट लोकांचा निःपात करिता आला नाही व ऑस्ट्रेलियालाहि कार्बोनारी गुप्तमंडळ्या नष्ट करिता आल्या नाहीत. आयर्लंडातील अत्याचार थांबत नाहीत याबद्दल तुम्हाला मलाहि अधिक दोष देता येणार नाही. बंडवाल्याशी सामोप- चाराचे बोलणे करण्याचा निषेध तुम्ही केला. पण आधी शरण या मग तुमचे काय म्हणणे असेल ते पाहू ही भाषा फक्त जुलमी सुलतानानीच बोलावी. पण मुत्सद्दी अशी भाषा बोलणार नाहीत. ते सामोपचारानेच प्रतिपक्षाचे समाधान करण्याचा प्रयत्न करतील. पूर्वी लॉर्ड चॅथम याना बंडवाल्या अमेरिकन लोकानी शाबासकी दिली, तसेच मीहि हे खून झाल्यावर म्हणतो की आयर्लंडने जुलमाची प्रति- क्रिया केली याचा मला आनंद वाटतो. कारण आमच्या हातून न्यायाची तशी हेळ- सांडच झाली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीत काही रक्तपात व अन्याय झाले ही गोष्ट खरी. तथापि गरिबाना छळणाऱ्या फ्रेंच जमीनदाराना बंडवाल्यापुढे मुठीत जीव घेऊन पळत सुटावे लागले ही गोष्ट एकंदरीने चांगलीच झाली. तुमचे म्हणणे असे काय की, हिंदुस्थानात जुलूम करिता यावा धाक दाखविता यावा म्हणून आयरिश लोकानाहि आम्ही तसेच वागवावे ? तुम्ही अफगाण युद्धासारखी नसती युद्धे उपस्थित करून घरच्या लोकाना धाक दाखविता तो पुष्कळ झाला. पण इकडे इंग्लंड व आयर्लंड यांचा संबंध कसा राहावा, त्यांचा तंटा कसा तुटावा, याचा विचार करीत असता इकडची कृति पाहून हिंदुस्थानातील लोकहि उठतील व