पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला ८८ ३७ प्रिय म्हणून त्यांचा पक्ष मोडून काढण्याच्या फंदात पार्नेल पडता तर तो स्वतःच मोडला जाऊन निकामी झाला असता. म्हणून पार्नेलने असे धोरण ठेवले की, फिनिअन लोकाना आपला आधार द्यावयाचा नाही पण त्यांच्या आधारावर जर आपले धोरण टेकविल्याने ताठर व जोरकस करता येईल तर ती गोष्ट खुशाल करावयाची. म्हणून दिसण्यात तो अत्याचाराच्या सरहद्दीवर उभा आहे असे दिसे. इंग्रज लोक त्याकरिता त्याचा द्वेष करीत. पण आयरिश जनता त्याचकरिता त्यावर प्रेम करी. फिनिअन लोकाबद्दल त्याला अतिशय सहानुभूति वाटे. पण त्याना आपण हार जावयाचे नाही असा त्याचा निश्चय असे. त्यांच्या चळवळीची मदत आपल्या उद्योगाला होईल ती घ्यावी पण आपल्या पक्षात येऊन त्यानी बहुमत करून आपले धोरण बिघडवावे ही गोष्ट त्याला संकटासारखी वाटत असे. ही गोष्ट न घडावी असा त्याचा पराकाष्ठेचा प्रयत्नहि असे. फीनिअन चळवळीचा तापट घोडा आपल्या सनदशीर चळवळीच्या धिम्या घोड्याबरोबर जोडून राजकारणाची गाडी हाकण्याला तो तयार होता. पण आपल्या धिम्या घोड्याचा लगाम तर आपल्या हातून जाऊ नयेच पण तापट घोड्याचाहि लगाम आपल्याच हाती राहावा या शर्तीवर ही जोडी बनविण्याची त्याची तयारी असे." वुइल्यम ओब्रायन याने असे लिहिले आहे की “ पार्नेलचे हे धोरण पुढे यशस्वी झाले आणि फीनिअन चळवळीतील काही पुढारी हेच त्याचे सर्वांत कट्टे व विश्वासू अनुयायी ठरले. व असे होणेच स्वाभाविक होते. पार्लमेंटमधील सामोप- चाराची चळवळ अप्रामाणिक स्वार्थी भित्र्या लोकांच्या हाती गेल्यामुळे ती अप्रिय झाली होती. जे लोक हू की चू केल्याशिवाय फासात आपला गळा अड- कविण्याला किंवा तुरुंगात राहून जन्मभर आपले स्वातंत्र्य गमावण्याला तयार झाले त्याना या पार्लमेंटरी चळवळीबद्दल तिटकारा वाटावा दे अगदी स्वाभा- विक होते. हा त्यांचा तिटकारा पुढे निघून गेला पण तो कशाने तर ही चळवळ खरोखर प्रामाणिक व धीट अशा पार्लमेंटरी पुढाऱ्यांच्या हाती गेल्याने. पण अशा लोकाना ही विचारक्रांति घडवून आणण्याला अनेक वर्षे सतत परिश्रम करावे लागले. ते करिताना नैतिक शक्ति व शारीरिक शक्ति या दोहोंचा समानतेने स्वीकार करून, उदात्त अशा राष्ट्रीय भावनेने राष्ट्रीय कार्यात त्या दोहोंचा उप- योग करून घेतला, व अत्याचाराचा मार्ग हा खरा राजकारणाचा योग्य किंवा यशस्वी मार्ग नव्हे अशी खात्री करून देताना, सनदशीर म्हटल्या जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करणाराने, स्वतः अप्रियता सोसण्याची तुरुंगात जाण्याची व वेळी मृत्यु- मुखी पडण्याचीहि तयारी दाखविली व आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला म्हणू- नच ही गोष्ट घडून आली. त्याना जवळ जवळ असे सिद्ध करून दाखवावे लागले की तुमच्या आमच्यात फरक इतकाच की तुम्ही हातात हत्यारे घेता आणि आम्ही ती हातात घेत नाही किंवा घ्या म्हणून सांगत नाही. एरव्ही तुम्ही आम्ही एकच. " आणि या दोन धोरणातील फरक स्वतः ग्लॅडस्टन याने एके प्रसंगी स्पष्ट शब्दानी