पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र भांग ८ पण विस्तार टाळून प्रस्तुत मुद्यापुरतेच बोलावे म्हणून आयर्लंडातील सनदशीर चळवळीचे पुरस्कर्ते अत्याचारी लोकाविषयी कसे उद्गार काढीत याचेच फक्त काही मासले देतो. आयझॅक बट याला अत्याचारी चळवळच काय पण पार्लमेंटातील पार्नेलचे अडवणुकीचे धोरणहि मान्य नव्हते. ही अडवणूक म्हणजे व्यक्तीच्या व राष्ट्राच्या संभावितपणाला दूषण, तो केवळ ग्राम्यपणा, म्हणून त्याज्य असे मानण्यापर्यंत त्याची मजल जाई. पण या इतक्या सोवळ्या माणसाची भावना अत्याचारी देशभक्तासंबंधाने काय होती हे त्याच्याच शब्दाने पाहू. ते सांगण्यापूर्वी आणखीहि एक गोष्ट सांगणे अवश्य ती ही की अत्याचाराचा निषेध करणारा आयझॅक बट अत्याचारी गुन्हेगारांचा ठराविक वकील असे. आणि त्याचे मवाळ धोरण मनातून पसंत नसले तरी सहानुभूतिपूर्वक केलेल्या या मदतीबद्दल अत्याचारी लोकहि त्याच्याविषयी मनात आदरबुद्धि व कृतज्ञता बाळगीत. वकिलीत आपले खरे मतच बोलून दाखविले पाहिजे असे नाही. पण पार्लमेंटच्या सभागृहात मनुष्य जे बोलल ते तरी त्याचे व्यक्तिशः मत खरोखर असते असे घेऊन चालण्यास हरकत नाही. म्हणून आयझॅक बट याने म्हणजे या अत्यंत सोवळ्या मुत्सद्याने पार्लमेंटमध्ये अत्याचारी देशभक्तासंबंधाने काय उद्गार काढले तेच देतो. तो म्हणाला " ग्लॅड- स्टन साहेब म्हणतात की फीनिअन नामक अत्याचारी लोकानी आयरिश जन- तेचा असंतोष किती तीव्र आहे हे मला शिकविले, पण मी म्हणतो की याहूनहि कित्येक अधिक चांगल्या गोष्टी फिनिअन लोकानी मला शिकविल्या. परराज्याने लोक किती नाखुष होतात, त्यांची निराशा कशी होते, निराशेने ते तामसी कसे होतात, व अत्याचाराकडे वळतात हे तर मी शिकलोच. पण अशा लोकांचे मातृ- देशावरचे प्रेम किती थोर किती व्यापक व किती तळमळीचे असते हेहि पण मी शिकलो. त्यांच्या पैकी कित्येक लोकानी मरणाची शिक्षा किती धैर्याने व गांभी- श्रीने सोसली हे पाहून कोणाचीहि तेव्हाच खात्री झाली असेल की या व्यक्ति अधम नसून त्याना खुनी किंवा गळेकापू म्हणणे हाच उलट अधमपणा होय. आपले सर्वस्व देशाला वाहणाऱ्या मनुष्याने आणखी निस्वार्थीपणा तो दाख- विण्याचा काय उरला ? त्यांच्या तत्त्वांचा उच्चपणा त्यांच्या अंगीकृत कार्याची थोरवी हीच त्यांच्या तोंडून मृत्यूच्या प्रसंगीहि प्रतिष्ठेचे व भलेपणाचे शब्द वदविते आणि हा प्रकार पहाणाराला त्यांच्याविषयी दया व प्रेम वाटून त्यांच्या चरणी आदरबुद्धीचा करभारहि वाहावासा वाटल्यास काय नवल १ " पार्नेसंबंधाने त्याचा चरित्रकार याविषयी असे म्हणतो: “फिनिअन लोकांची कळकळ व उद्योगशीलता पाहून पार्नेल त्यांचा गुणच घेई. पण या सद्गुणांचा उपयोग आपल्या सनदशीर चळवळीला कसा होईल एवढ्याच दृष्टीने तो त्यांजकडे पाही. फिनिअन लोकांच्या आवेशाचा जोर कमकुवत करण्याचा प्रयत्न पार्नेलने कधी केला नाही. पण त्या शक्तीचा उपयोग आपण पसंत करू त्या मार्गाने कसा करून घेता येईल हेच तो पाही. फिनिअन लोक अत्याचार-