पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला ३५ मार्गाच्या पूजकांचे त्या वेळी देव्हारे माजतात आणि जुन्या पुढाऱ्यानी पूर्वी कितीहि लौकिक मिळविला असला तरी तो विसरला जाऊन त्यांच्या सेवेविषयीची कृतज्ञताबुद्धिहि दुर्दैवाने नष्ट होते. आयर्लंडच्या इतिहासात शार्लमॉट मॅटन लड बुल्फटोन डानियल ओकानेल स्मिथ ओब्रायन आयझॅक बट आकॉनर. पावर पार्नेल रेडमंड मॅकस्विनी डी व्हलेरा कॉजवेव्ह वगैरे पुढा-यांची अशीच स्थिति झाल्याचे आढळते. एक वेळी ब्रिटिश पार्लमेंटशी संबंध ठेऊन तदंकित व तदंग- भूत असे आयरिश पार्लमेंट आयरिश लोकाना बरे वाटले. एक वेळी फक्त इंग्लं डच्या राजाला मान्यता द्यावी पण बाकी सर्व आयरिश कारभार स्वतंत्र चालवि- णारे वेगळे पार्लमेंट असावे असा ध्यास लोकानी घेतला. एक वेळी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आयझॅक बट याचे सामोपचाराचे धोरण त्याना आशाजनक म्हणून बरे वाटले. एक वेळी स्वतंत्र पार्लमेंट मिळविण्याचीच चळवळ पण ती ओकॉनेलने चालविल्याप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्याने मिळविण्याची चळवळ लोकाना पसंत वाटली. एक वेळी पार्नेलच्या अडवणुकीच्या धोरणावर लोक खुप होते. एक वेळी डाशिवाय काही होणे नाही असे त्यांच्या मनाने घेतले. एक वेळी लँडलीगसारखी चळवळ यशस्वी करून शेतकरी वर्ग सुखी केला म्हणजे त्यात सगळे आले असा त्याना भास झाला. अशा रीतीने रत्नाच्या निरनिराळ्या अंगातून निरनिराळे रंग दिसावे त्याप्रमाणे आयरिश जनतेच्या ध्येयाची व साधनांची निरनिराळी रूपे लोकाना दिसून आली. पण राजकारणातील विचाराची ही क्रांति होण्याला लहरी जनता व निर- निराळ्या स्वभावाचे पुढारी हे दोघेहि मिळून कारणीभूत झाले. जनतेच्या मनाचा रागरंग पाहून पुढाऱ्यानी जसे आपले धोरण बनविले तसेच त्यांचे कर्तृत्व पाहून जनतेनेहि वेळोवेळी आपली मते बदलण्याची तयारी दाखविली. पण कोणतीहि क्रांति म्हटली म्हणजे तीत नवी उत्सवमूर्ति मांडून जुनी फेकून देणे हा क्रम अबा- धितच राहिला. शिवाय या मूर्तिभंगाच्या कामात नवीन नवीन पुढाऱ्यानी स्वतः हातभार लावलेला होता. याचे कारण असे की एका म्यानात दोन तलवारी एकाच वेळी मावत नाहीत त्याचप्रमाणे कोणत्याहि एका वेळी एकच राजकार- णाचे धोरण प्रभावी होऊ शकते. एकाच वेळी निरनिराळी धोरणे प्रभावी होत नाहीत. यामुळे नव्या पुढाऱ्याला जुन्या पुढाऱ्याची निंदा हेटाळणी करणे प्राप्त होते, व त्याला अहंकाराची भर पडली म्हणजे मग या अनिष्ट भावना सहजच विकोपास जातात. बरे परिस्थिति व लोकमताचा रागरंग पाहून जुना पुढारी नव्याला मान देऊन त्याच्या तंत्राने वागेल व दोघे मिळून काम करतील असे म्हणावे तर मनुष्यस्वभावामुळे तेहि शक्य नसते. पण व्यक्तिला व्यक्तीने कितीहि वाईट रीतीने वागविले तरी एका समग्र वर्गाच्या मनात दुसऱ्या समग्र वर्गासंबं- वाने सर्वस्वी अनादर असतो असे नाही. ही गोष्ट निरनिराळ्या प्रकारानी सिद्ध करता येईल.