पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ टिळक सुवराव संभाषण ५३ राव यास सुचविलेले सर्वच शोध त्यानी दाखल केले असे नाही. ते तसे केले असते तर या लेखाचे स्वरूप वेगळे झाले असते. दुसरे असे की तुमचे म्हणणे तुम्हीच लिहून द्या असे सुबाराव यानी सागितले असते व ते टिळकांचे टिळकानीच लिहून दिले असते तर त्याचे स्वरूप याहून आणखी निराळे झाले असते. असो. नंतर सुबाराव तो लेख मद्रासेस घेऊन गेले. त्यांच्या कडून आलेल्या लेखाच्या नकलेचा तरजुमा खाली दिला आहे. टिळक- सुबाराव संभाषण ना. सुबाराव यानी आपल्या आपण लिहिलेल्या व टिळकांच्या सूचनेवरून स्वहस्तानेच दुरुस्त केलेल्या इंग्रजी मजकुराचे भाषांतर खाली दिले आहे. सव्र्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटी. पुणे ता. ९ डिसेंबर १९१४ " नॅशनॅलिस्ट पक्ष म्हणजे ज्याना जहाल पक्ष असे नाव देण्यात येते तो राष्ट्रीय सभेतलाच एक पक्ष आहे. फक्त त्यातल्या त्यात तो अघाडीचा किंवा इतराच्या मानाने किंचित पुढे पाऊल टाकणारा असा पक्ष आहे. पण त्याचे धोरण सामान्यतः सरकाराविरुद्ध सनदशीरपणाने तक्रार करण्याचे असते; व ज्याना कॉन्स्टिटयूशनॅलिस्ट म्हणतात त्या मवाळांचे धोरण सामान्यतः सरकारच्या बाजूला राहण्याचे असते. दोघाचे ध्येय एकच म्हणजे साम्राज्यान्तर्गत स्वराज्य मिळविणे हेच आहे. हे ध्येय मिळविण्याच्या रीतीतला हा जो फरक तोच दोहो- पक्षातला फरक. ." राष्ट्रीय पक्षाचे लोक राष्ट्रीय सभेत जाण्यास मनाने तयार आहेत व होते. पण या सभेची घटना, विशेषतः प्रतिनिधि निवडण्यासंबंधाचे नियम आपला अपमान होईल अशा रीतीने बनविले गेले आहेत असे त्याना वाटते. हल्लीच्या काँग्रेस कमिटीच्या द्वारे आत येण्याची त्यांची इच्छा नाही. कोणास आत घ्यावे अगर न घ्यावे यासंबंधाचे वाटतील तर नियम करण्यात यावे पण ज्याला ताळ ना तंत्र अशा अनियंत्रित रीतीने हा माणूस अमकातमका किंवा असातसा आहे म्हणून आम्ही त्याला आत घेऊ अगर घेणार नाही असल्या अरेरावीला राष्ट्रीय पक्षाची हरकत आहे व याचकरिता आपल्या संस्थाना प्रांतिक काँग्रेस कमिटीकडून अधिकारपत्र मागण्याची त्यांची इच्छा नाही. जर स्वतंत्र व पृथक् असे मतदारसंघ (अर्थात् कान्स्टिटयूशनचे नं० १ चे कलम मान्य कर- तील असेच संघ ) निर्माण करण्यात येतील व त्याना केवळ वरील कलम मान्य केल्यामुळे आपल्याआपण व इतर कोणाकडे याचना न करिता आपल्या सभा किंवा आपण बोलावलेल्या जाहीरसभा यातून प्रतिनिधि निवडण्याचा हक्क मिळेल तर राष्ट्रीयसभेत जाण्याची त्यांची इच्छा आहे.