पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ " हे घडून आल्यास जरूर तर पूर्वीप्रमाणे निवडणुकीचा मार्ग याहून अधिक खुला करण्याची खटपट करण्याचा त्यांचा इरादा आहे. तसेंच आपल्या काम करण्याच्या रीतीसंबंधाने लोकमत जागृत करून व शक्य तर खुद्द राष्ट्रीयसभेत बहुमत मिळण्याची खटपट करून सदर सभेकडून या रीतीस संमति मिळविण्या- चाहि त्यांचा इरादा आहे. राष्ट्रीय सभेतील बहुमताच्या निकालाने आपण बांधले गेलो आहो ही गोष्ट त्यास आज मान्य आहे व पूर्वीहि होती. हे बहुमत त्यास प्रतिकूल असेल तर आपल्या बाजूला लोकमत वळेपर्यंत ते थांबतील; बहुमतवाल्याशी भांडण करून राष्ट्रीय सभा सोडून जाण्याचा त्यांचा विचार नाही. " वर सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण न होतील तर राष्ट्रीय सभेबाहेर राहावे व कदाचित् स्वतःचा राष्ट्रीय संघ स्वतःच्या धोरणानुरूप बन- वून राष्ट्रीय सभेशी संबंध न ठेवता आपले काम करीत जावे हेच त्यास अधिक बरे वाटेल. " दोन मनुष्ये आपापसात जे काय ठरले त्याबद्दल गैरसमज राहू नये म्हणून शब्दानी पांढऱ्यावर काळे करून जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्यातील मजकुराबद्दल अमक्याच्या इतर बोलण्यावरून माझी तमकी समजूत झाली असे सांगत बसणे सर्वस्वी असभ्यपणाचे व अन्यायाचे आहे व हा नियम केवळ लौकिकांतच चालतो असे नव्हे तर कायद्यातहि स्वीकारलेला आहे म्हणून अशा प्रसंगी सुबारावांच्या बोलण्यावरून माझी अशी समजूत झाली असे बोल- णाऱ्या किंवा लिहिणाऱ्या गृहस्थास ' अशी समजूत होणारे तुम्ही मूर्ख आहां ' यापेक्षा काहीएक उत्तर नाही. तोंडातोंडी कितीहि बोलणे झाले तरी कागद करा- वयाचा तो कशासाठी ? पुढे गैरसमज होऊ नये म्हणून. आणि तो कागद बाजूला ठेवावयाचा, आणि कित्येक तासपर्यंत झालेल्या भाषणातील कोणास- किंबहुना खुद्द संभाषण करणारास आठवत असलेले शब्द आपल्या समजुतीच्या समर्थनार्थ पुढे आणावयाचे हा संभावितपणा नव्हे, आचरटपणा होय; आणि एवढी साधी गोष्ट ज्याना कळत नाही त्यानी वादविवादात पडू नये हे चांगले. सुबारावाचे आणि टिळकांचे अखेर काय ठरले ते वर प्रसिद्ध केलेला मूळ लेखाचा तरजुमा वाचला म्हणजे वाचकास सहज कळून येईल. हातचे कंकण आरशात बघण्याचे काही कारण नाही. राहता राहता विझांटबाई आणि टिळक यांचे दरम्यान तारेने जो व्यवहार झाला तेवढाच शिल्लक राहिला. या बाबतीत ज्ञान- प्रकाशकारानी निवळ खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे. मिसेस बिझांटबाईनी टिळकांस जी तार केली ती खाली लिहिल्याप्रमाणे होती:- Moved amendment. Debate adjourned. It is said by opponents you favour boycott of Government. I say you do not. Wire which is truth. ( Reply prepaid ). रा. टिळक यानी या तारेस जे उत्तर पाठविले ते:- -