पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.५२ ८८ लो. टिळकांचे चरित्र " भाग १ असे स्वतः नाः गोखल्यानीच स्पष्ट कबूल केले आहे. निःशस्त्रप्रतिकार हा सर- कारापाशी रुसवा आहे; सरकारचा बहिष्कार नव्हे. रुसवा केला तरी सर- कारापासूनच हक्क मागून घेण्याचे असल्यामुळे तो कायदेशीर आहे आणि 'सरका- रचा' बहिष्कार तसा होत नाही. टिळक यानीच नव्हे तर बाबू सुरेंद्रनाथ किंवा बाबू भूपेंद्रनाथ यानी किंवा इतर बंगाली पुढाऱ्यानी त्या वेळी अशाच प्रकारची किंबहुना याहून कडक भाषणे बंगाल्यात केलेली आहेत. तथापि हे गृहस्थ काँग्रेस- मध्ये येण्यास अपात्र आहेत असे कोणी म्हटले नाही व म्हणतहि नाही. मुलगा ज्याप्रमाणे बापाशी हट्ट करतो त्याप्रमाणे प्रसंगविशेषी सरकाराशी हट्ट किंवा रुसवा करणे निराळे, आणि सदासर्वदा सरकारला बहिष्कार टाकणे निराळे. प्रसंगोपात्त पहिला मार्ग स्वीकारावा लागतो ही गोष्ट टिळकानी अनेक ठिकाणी सांगितली आहे परंतु दुसरा मार्ग त्यानी कधीहि प्रतिपादिला नाही किंबहुना तो वेडेपणाचा आहे असे म्हटले तरी चालेल. पण हे सूक्ष्म भेद डोके एकीकडे तर लेखणी एकीकडे अशी जेथे स्थिति आहे तेथील लेखणीहाक्यांच्या लक्षात कसे येणार ? टिळकाना कोणीकडून तरी मारावयाचे, आणि ते सरकारच्या विरुद्ध आहेत असे जाहीर केले म्हणजे आयतीच त्यांची वाट लागेल, यापेक्षा यांचा दुसरा काही विचार नसतो. पण या सद्गृहस्थास आमचे एवढेच सांगणे आहे की, आता हा धंदा पुरे झाला किंबहुना त्यातील बीज सरकारासहि समजले आहे तेव्हा आता बऱ्या गोष्टीने मुद्यावर या कसे ? गोखल्यांच्या गुप्त पत्राने समेट बिघडला हे निर्विवाद आहे. मग तुमच्या गुरूच्या पेटीत तुम्हास ते पत्र सापडल्यास प्रसिद्ध करा आणि स्नान करून मोकळे व्हा म्हणजे झाले. गोखल्यांच्या पत्रामुळे 'टिळक' सरकारचा बहिष्कार करणार आहेत अशी सब्जेक्ट कमिटीत समजूत झाली ही गोष्ट निःसंशय आहे. आता त्याच्या समर्थ- नार्थ टिळक सुबराव यांचे संभाषण पुराव्यास म्हणून ज्ञानाचे खंदक पुढे आणतात त्यातील तथ्य काय ते पाहू. टिळक आणि सुबाराव यांचे मोकळ्या मनाने दोन चार तास संभाषण झाले ही गोष्ट कोणासहि नाकबूल नाही. हे संभाषण झाल्यावर त्यातील मुद्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून सुत्राराव यानी त्या रात्री व दुसऱ्या दिवशी त्यातील मुद्याच्या गोष्टी हाताने लिहून काढल्या, व या टिळकांच्या पहाण्यातहि आल्या नसत्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास पूर्वी न कळविता टिळक त्यांच्या परत भेटीस गेले. तेव्हा बरोबर रा. केळकरहि होते. तेव्हा सुबारावानी आपल्या हाते लिहिलेला हा लेख टिळकास वाचून दाख- विला आणि त्यात काही सुधारणा हवी असल्यास सांगा असे विचारले तेव्हा रा. - टिळकानी तो लेख सुबारावास पुनः वाचावयास सांगितला व सुबाराव तो वाचीत असता त्यात दोन चार ठिकाणी शब्दाचा भेद करण्यास सांगितला. नंतर त्या- प्रमाणे सुवारावानी आपल्या हाताने काही शोध घातले आणि टिळकानी हा लेख आता चालेल असे सांगितले. चालेल असे म्हणण्याचे कारण असे की एक तर सुबा-