पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ (१०) फिनिक्स पार्कमधील खुनी लोकाशी पार्नेल याचा आगे मागे कसलाहि संबंध नव्हता आणि हे खुनी लोक लँडलीगचे सभासद तेव्हाही नव्हते. हे पार्नेल कमिशन कोणत्या कारणाने नेमले गेले ? त्यापुढे चौकशीचा विषय केवढा मोठा होता ? पुरावा किती घेतला गेला ? आणि अखेर कमिशनने निर्णय काय दिला? हा सर्व वृत्तांत लक्षात घेतला म्हणजे आयर्लंडमध्ये पार्नेलसारखे पार्लमेंटरी पुढारी व अत्याचारी पक्ष यांचा परस्पर संबंध कसा होता है इतके स्पष्ट रीतीने वाचकाना दिसून येईल की त्यावर वेगळी टीका करण्याचे कारणच नाही. आणि जे सहृदय वाचक या वरील सर्व वृतांताचे वाचन व मनन करतील त्याना राजकारणी पुढाऱ्याला दोन्ही अंगच्या मतभेदाच्या कात्रीतून स्वतःला कसे बचा- वावे लागते, व हा बचाव करिता करिताहि होणाऱ्या लहान सहान जखमा व ओरखाडे कसे सोसावे लागतात, हे सहज दिसून येईल. आता शेवटी या दोन पक्षातील संबंध खरा काय असतो हे सांगितल्यावर त्यातील पुढाऱ्यांचे एकमेकाशी प्रत्यक्ष वर्तन कसे असते हेहि थोडेसे सांगून हे प्रकरण पुरे करू. या वर्तनासंबंधाने पहिली गोष्ट सांगण्याची ती अशी की तीव्र मतभेदाचा परिणाम अखेर विद्वेषात झाल्याशिवाय कोठेहि राहात नाही. आयर्लंडातहि ही गोष्ट ठळक रीतीने दिसून आली आहे. कोणाहि पुढाऱ्याला आपले मत प्रभावी व्हावे व इतर सर्व पुढाऱ्यानी तेच आह्य समजून त्याचाच अंमल करावा असे वाटणे स्वाभाविक असते. कल्पनेच्या वाऱ्याने उठलेला काहीतरी विचारतरंग म्हणून नव्हे, तर कार्यकार्य युक्तायुक्त पाहून इष्टसाधक म्हणून एखादा मार्ग ठरवून त्यावर निश्च- याचे एकीकरण त्याने केले आहे व त्या मार्गाविषयी त्याची त्या वेळेपुरती अढळ निष्ठा बनली आहे असाच अर्थ 'जबाबदार पुढाऱ्याचे मत' या शब्दांचा करावा लागतो. पण जी गोष्ट एका पुढाऱ्याची ती इतर पुढाऱ्यांचीहि असते. निष्ठेचा गुण हा देशभक्तिप्रमाणे ईश्वराने एकालाच दिलेला नसतो. यामुळे निरनिराळ्या मार्गीच्या निष्ठामध्ये कलह होतो व वेळी युद्धद्दि जुंपते. तसेच लोकमत व लोकप्रियता या गोष्टी पुष्कळशा नित्य स्वरूपाच्या किंवा निष्ठेच्या नसतात तर वाऱ्याने उठणाऱ्या लाटेच्या आंदोलनाप्रमाणे त्यांची गति असते. एकाच दिशेने जात असताहि लोकाना एका वेळी एक मार्ग श्रेयस्कर वाटतो व हुल्लड उठते तर दुसऱ्या वेळी दुसराच एकादा मार्ग त्याना पटू लागतो व मग त्याचीहि हुल्लड उठू लागते. आयर्लंडच्या इतिहासात अर्जापासून अत्याचारापर्यंत निरनिराळ्या वेळी निरनिराळे मार्ग लोकाना पसंत पडले व त्यावर झोड उठविली गेली. पण त्याच्या अनुषंगाने हीहि गोष्ट घडली की एक उत्सवदेवता नव्या सणाकरिता पुजारी पुढे मांडून बसला म्हणजे पूर्वीची दुसरी उत्सवदेवता तो उचलून ठेवतो. आणि ती मोडून फेकूनच न दिली तरी अडगळीत टाकून देतो व मग ती धूळखात पडते किंवा आपोआप मोडते. त्या- प्रमाणे कोणताहि एकादा राजकारणाचा नवा मार्ग लोकाना पटला म्हणजे त्या