पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाँग ८ आयर्लंडचा दाखला - ३३ जमीनदाराना खंड देण्याचे थांबवून त्याना भिकेला लावून इंग्लंडला परत पाठ- वावयाचे. लँड-लीग स्थापणारांचा व तिचे सभासद होणारांचा या बाबतीत कट होता. (३) प्रतिवादीवर एक आरोप असा होता की, सोईप्रमाणे ते अत्या- चाराचा निषेध करीत आणि फिरून आम्ही निषेध केला तो खऱ्या मनाने नव्हे असेहि अत्याचारी लोकाना सांगत. परंतु हे आरोप खोटे आहेत. पार्नेलच्या सहीचे पत्र बनावट होते. आणि फिनिक्स पार्कमधील खुनाचा त्याने व इतरानी जो निषेध केला तो खऱ्या मनाचाच होता. (४) 'आयरिश वर्ल्ड' नांवाचे पत्र प्रतिवादीने काढून चालविले त्याचा तू राजद्रोह पसरविण्याचा फैलावण्याचा व राजद्रोहाचे गुन्हे करविण्याचा होता. (५) प्रतिवादीनी प्रत्यक्ष गुन्हेगाराना चिथावणी कधीहि दिली नव्हती. पण इंग्रज लोकाना धाक बसेल अशी कृत्ये करणारानाहि ते उत्तेजन देत व त्या उत्तेजनाचा परिणाम खुनात होई. पण कोणताहि गुन्हा करणाराला पैसे देऊन वगैरे मदत केली ही गोष्ट मुळीच शाबित झाली नाही. (६) प्रतिवादीनी गुन्हे थांबविण्याचे प्रयत्न केले नव्हते असा त्यांचेवर आरोप होता. पण आम्ही असा निर्णय देतो की, कित्येक प्रतिवादी व विशेषतः मायकेल डेव्हिट यानी अत्याचारांचा निषेध केला होता तो खऱ्या मनाचा होता. पण धाकदपटशाहीचा परिणाम खुनात होई तरी धाक दपटशाही करणारांचे प्रयत्न यांत्र- विण्याचे प्रयत्न केले नव्हते. आणि धाकाचा परिणाम गुन्ह्यातच होतो हे त्याना माहीत होते. (७) प्रतिवादीनी गुन्हेगारांचा कोर्टात बचाव करण्याकरिता मदत केली ही गोष्ट खरी. तसेच तुरुंगात जाणाऱ्या लोकांच्या कुटुंबाना त्यांच्या पश्चात् पैशाची मदत देऊन जगविले हेहि खरे. पण गुन्हेगारांचा सत्कार करणे किंवा त्याना पळून जाण्याला मदत करणे अशा गोष्टीना त्यानी पैशाची मदत केली हे आरोप खरे नाहीत. (८) ज्या गुन्हेगाराना गुन्हेगारीत जखमा वगैरे झाल्या व ज्यांच्या कामगिया वगैरे बुडाल्या त्यांची नुकसानभरपाई करण्याकरिता काही प्रतिवादीनी पैशाची मदत केली हे खरे आहे. ( ९ ) अत्याचारी लोकापासूनहि प्रतिवादीनी आपल्या कार्याला वर्गण्यांची मदत घेतली ही गोष्ट खरी आहे. तसेच ही गोष्टहि खरी आहे की अमेरिकेतील अत्याचारी पक्षाकडून आपल्या पार्लमेंटमधील चळवळीला साहाय्य मिळावे या.. विषयी प्रतिवादीनी त्यांच्याकडे मदत मागितली. आणि ती मदत मागत असता व मिळावी म्हणून त्यानी त्यांच्या अत्याचारांचा उघड निषेध केला नव्हता. टि. उ... ४४