पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ बोलावे व याने फक्त ऐकून घ्यावे आणि आपल्याला काय हवे इतकेच त्यांच्यापुढे मांडावे असे घडे. पार्नेल लँग लीगकरिता वर्गणी गोळा करण्याला गेला त्यावेळी त्याच्यावर असे प्रसंग फार आले. कारण आयर्लंडात व अमेरिकेत देशभक्त पुष्कळ पण सनदशीर चळवळीचा भोक्ता एकहि नव्हती. अशा लोकाशी बोलण्याची प्रसंग आला म्हणजे ते पार्नेलला जवळजवळ वेड्यात काढीत आणि आपल्या गुप्तं चळवळीला येऊन मिळण्याविषयी सांगून पाहात, पण त्याना दाद न देता त्यांच्याशी हुजत न घालिता तो आपल्या प्रस्तुत कार्यापुरता त्यांच्याशी बोले. पॉर्नलविरुद्ध वर सांगितलेला एवढाच तोंडी पुरावा. कमिशनच्या ५० व्या बैठकीच्या दिवशी टाइम्समध्ये प्रसिद्ध केलेल्या बनावट पत्राबद्दल पुरावा सुरू झाला. प्रथम टाइम्सच्या व्यवस्थापकानी ही पत्रे आपणाला कोठून कशी मिळाली व त्याकरिता आपण २५०० पौंड कसे दिले वगैरे सांगितले. नंतर एक तज्ज्ञ बोलावून पत्रावरील सहीचे अक्षर हे पार्नेलचे असावे असे शाबीत करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी मूळ ज्या गृहस्थाकडून पत्रे मिळाली त्याला पुढे आणणे भाग पडले; कारण मनुष्य जिवंत होता व पुढे येण्याला कबूल होता. असा साक्षीदार पुढे येऊन तो टिकला म्हणजे फिर्यादीचे काम झाले असे समजून पिंगट याची साक्ष घेण्यात आली. पिगट याने तारीख २१ फेब्रुवारी रोजी पुढे येऊन जबानी दिली. पण आयरिश पक्षाचे बॅरिस्टर सर चार्लस रसेल यांच्या उलट तपासणीत तो कोसळला. त्याने लॉ बुशेरपुढे आपण पत्रे बनावट केल्याची कबुली लिहून दिली. आणि कोर्टाचे समन्स असता ते चुकवून तो स्पेन देशाला पळून गेला पोलिसाना पाहताच तुम्ही बाहेर बसा मी येतो असे सांगून तो आत गेला. आणि पिस्तुलाने त्याने कपाळमोक्ष करून घेतला. अशा रीतीने पार्नेलविरुद्ध टाइम्सने प्रसिद्ध केलेली पत्रे बनावट ठरली आणि अत्याचारी लोकाना सहानुभूति दाखविल्याचा लेखी म्हणून जो पुरावा पुढे आला होता फुकट गेला. तरीहि अर्थात कमिशनचे काम पुढे चालूच होते. आणि तारीख १३ फेब्रुवारी १८९० रोजी कमिशनचा रिपोर्ट पार्लमेंटपुढे दाखल करण्यात आला. कमिशनने निरनिराळ्या मुद्यावर काय काय निकाल दिला हे येथे थोडक्यात सांगितले असता हे एकंदर प्रकरण काय होते आरोप कसले होते त्यातून पार्नेल कशा रीतीने बाहेर पडला आणि कोणते दोषारोप त्याच्यावर चिकटले हे लक्षात येईल. कमिशनच्या निर्णयाचा सारांश खालीलप्रमाणे:- (१) प्रतिवादी पार्लमेंटचे सभासद हे आयर्लंडला स्वातंत्र्य मिळविणा- रांच्या कटात सामील नव्हते. पण त्यातील काही व मायकेल डेव्हिड यानी आयरिश लँड - लीग स्थापन केली. आणि त्यांचा मात्र हेतू आयर्लंडला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा होता. (२) प्रतिवादी यानी असे ठरविले होते की जमीनदाराना धाक दाख- वून व बळजबरी करून शेतकरी लोकांची चळवळ चालवावयाची, आणि इंग्रजी