पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भागे ८ आयर्लंडचा दाखला ३१ कमिशन टाइम्सच्या लेखांवरून उद्भवले. पण कमिशनची नेमणूक सरकारकडून झाल्यामुळे फिर्यादीतर्फेचे काम हे मुख्यतः आपलेच आहे असा बाणा प्रधान मंडळाला करिता आला. आणि टाइम्सतर्फे पुराव्याची वगैरेची जी जी खटपट झाली ती सर्व सरकारने स्वतः केली. प्रगट पोलिस गुप्त पोलिस चहाडखोर हस्तक सर- कारी अधिकारी ऑनररी मॅजिस्ट्रेट शेरीफ - तात्पर्य जितक्या लोकांकडून पुरा- च्याचे कामी मदत मिळण्यासारखी होती तितक्यांच्या कडून सरकारने ती देववून नाही नाही तेथून म्हणजे अमेरिकेसारख्या परदेशातूनहि मिळतील ते साक्षीदार सरकारने आणविले व कमिशनपुढे उभे केले. पार्नेलविरुद्ध पत्रे प्रथम बाजूलाच राहिली. आणि लँडलीगच्या चळवळीच्या इतिहासापासूनच पुराव्याला सुरवात झाली. पार्नेलविरुद्ध जो काही प्रत्यक्ष तोंडी पुरावा म्हणून आला तो कमिशनच्या ४४ व्या बैठकीत ! या दिवशी आयरिश चळवळीत गुप्त रूपाने आपण राहून कटवाल्यांचे सर्व बेत ऐकत होतो असे सांगणारा एक पोलिसवजा. मनुष्य अमे रिकेतून साक्ष देण्याला आला. पण त्याने सांगितले ते इतकेच की " १८८१ साली एके दिवशी मी पार्लमेंटच्या सभागृहाजवळच्या दालनात उभा होतो. तेथे पार्नेलची व माझी गाठ पडली. पार्नेल मला म्हणाला की आयर्लंडमधील फ़िनीअन म्हणजे अत्याचारी लोक आमच्या सनदशीर पार्लमेंटरी चळवळीत सामील होतील अशी गोष्ट मला घडवून आणावयाची आहे तरी अमेरिकेतील कटवाल्याच्या मुख्य पुढाऱ्याला तुम्ही आयर्लंडात बोलवा व त्याची माझी गांठ घालून द्या. कारण त्याची खात्री करून देऊन इकडील अत्याचारी लोकांचे मन या सनदशीर चळवळीकडे वळवावयाचे आहे. त्याच्या सांगण्यानेच ते ऐकतील. पण चमत्कार हा की पार्नेलशी असे ते बोलणे झाले असताहि या गुप्तहेराने पुढे त्याविषयी काहीच केले नाही आणि प्रकरण तितकेच राहिले. स्वतः पार्नेलला कमिशनने विचारले तेव्हा त्याने सांगितले की " अशा एखाद्या गृहस्थाशी अशा विषयावर माझे संभाषण कदाचित झालेहि असेल. पण मला पक्के असे काहीच स्मरत नाही. आणि या मुद्यावर कमिशननेहि पुढे इतकेच लिहिले की पार्नेल आणि हा गृहस्थ यांच्या दरम्यान ही भेट व हे संभाषण झाले असेल असे दिसते. आणि पार्नेलच्या भाषणावरून या साक्षीदा राचा कदाचित असा ग्रह झाला असेल की पार्नेल हा उघडपणे अत्याचाराचा निषेध करीत नाही." पण केवढ्या मोठ्या कटाचा केवढा आरोप आणि त्याला तोंडी पुरावा हा इतका ! जॉन मोर्ले यांचे म्हणणे असे की ही भेट खरी म्हटली तरी इतकेच संभवनीय दिसते की तो गृहस्थ बोलला आणि पार्नेलने नुसते त्याचे म्हणणे ऐकून घेतले. कारण पार्नेलच्या स्वभावाचे त्याच्या चरित्रग्रंथकाराने या बाबतीत वर्णन केले ते असे की 'सनदशीर चळवळ करणारे लोक व अत्या- चारी यांचे मध्ये एक प्रकारची झुंझ लागून राहिलेली असे. अत्याचारी लोकांची व पार्नेलची गाठ पडली असता तो त्याच्याशी हुजत घालीत बसत नसे, त्यानी