पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ८ असे नाही, तर ज्या लेखमालेच्या समर्थनार्थ ही पत्रे प्रसिद्ध झाली होती त्या लेखमालेत जितक्या लोकांविरुद्ध जितके आक्षेप आणण्यात आले आहेत त्या सर्वांची चौकशी एकत्र होईल." हे प्रथम पार्नेलला कबूल असेल तर हे कमि- शन आम्ही नेमू असा बहाणा प्रधान मंडळाने केला. आणि पार्नेल हो गोष्ट कबूल करीत नाही असे दिसताच, यात काही तरी पाणी मुरते आहे असे सम जून, प्रधानमंडळाने जी गोष्ट पार्नेलला 'देऊ केली' ती नाकबूल झाल्यावर त्याच्या- वर 'लादण्याचे' ठरविले. कमिशनच्या या योजनेला पार्लमेंटरी बिलाचे स्वरूप देण्यात आले होते. कारण न्यायाधीश एरवी कायदेशीर अधिकारी कसे होणार ? पार्नेल व त्याचे मित्र यानी या बिलाला विरोध केला. त्यांचे म्हणणे असे की, " आम्ही मागितले एक आणि आम्हावर लादले जात आहे भलतेच. एक- दरीने लँडलीगची चळवळ कशी होती याविषयी टाइम्सने काय वाटेल ते लिहिले पण आम्ही तक्रार केली नाही. आणि त्याची आज आम्हाला चौकशीहि नको आहे. कारण टाइम्सचे या बाबतीतले आक्षेप कोणी खरे मानले तरी आमचे काही बिघडत नाही. ते सोसण्याला आम्ही तयार आहो. पण प्रत्यक्ष खुनाला उत्तेजन देणे हा आरोप असा तसा नाही. तो आरोप व्यक्तिशः काही पत्रव्यवहारातील आधारा- नेच करण्यात आला आहे. म्हणून फक्त तीं पत्रे खरी की खोटी इतकी चौकशी पार्लमेंटने करावी. एरवीची चळवळ व एरवीचा वाद हा पार्लमेंटमधील आपला नित्याचाच आहे." परंतु प्रधान मंडळाने या तक्रारीला न जुमानता बिल पास केले व कमिशन नेमले आणि चौकशीला सुरवात झाली. अर्थात पार्नेल व इत्तर आयरिश सभासद याना प्रतिवादी होऊन या चौकशीत सामील व्हावे लागले. प्रधान मंडळाचा डाव असा होता की एकंदर आयरिश चळवळीची चौकशी उपस्थित झाली म्हणजे एखाद्या ना एखाद्या प्रतिवादीवर अत्याचाराचा संसर्ग कोठून ना कोठून तरी चिकटेल आणि त्याच्या संपर्काने इतर प्रतिवादी आपोआपच खोटे ठरतील. कारण सर्वांचे हेतू व कार्य एकच असल्यामुळे एकाची जबाबदारी ती दुसऱ्याची जबाबदारीच आहे. या कमिशनच्या कार्याचा व्याप केवढा वाढला हे लक्षात येण्याला एवढे सांगितले असता पुरे की कमिशनची बैठक १८ सप्टें- बर १८८८ पासून २२ नोव्हेंबर १८८९पर्यंत सुरू होती. यापैकी प्रत्यक्ष काम १२८ दिवस चालले. साक्षीदारांची संख्या ४५० वर गेली. तीन वकीलांची भाषणे मिळून एकसारखी २४ दिवस चालू होती. पुराव्याच्या कागदाचे ११ मोठमोठे ग्रंथ बनले. आणि त्याच्या परिशिष्टांची संख्या सुमारे ८००० भरली. आणि साक्षीदाराना विचारलेल्या प्रश्नांची संख्या सुमारे ९८,००० होती. एकंदर १२ मुद्दे चौकशीला निघाले होते. त्यातील ३ पार्नेलच्या विषयीचे असून बाकीच्या ९ चा कटाक्ष असा होता की सर्व आयर्लंडभर मिळून पुढारी अनुयायी सहचर सहकारी स्नेही सोबती संबंधी संसर्गी सर्व लोकांचा मिळून एक गुप्त कट आहे. आणि त्या कटामुळे आयर्लंडमध्ये अत्याचार घडून येतात. वास्तविक दे