पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ८ आयर्लंडचा दाखला २९ विरुद्ध बिथरली होती. असा हा दुहेरी कोलदांडा होता. पार्नेलच्यातर्फे पहावयाचे तर लंडनमध्ये फिर्याद करून फुकट. एक तर निकाल हटकून विरुद्ध व्हावयाचा आणि बनावट पत्रे खरी ठरून जावयाची. उलट डब्लिनमध्ये फिर्याद केली तरी फुकट. कारण पार्नेलला जय मिळाला तरी लोक म्हणणार बोलून चालून ज्यूरी पार्नेलसारखा निकाल देणार. " अशा रीतीने फिर्यादीचा मार्ग हा व्यर्थ ठरला. आणि या फिर्यादीच्या कामावर एक पौंड देखील खर्च करू नये असे मोर्ले प्रभृति स्नेह्यानी पार्नेलला सांगितले. पण या प्रकरणाला पुढे एका वेगळ्या रीतीने तोंड फुटले. टाइम्समधील लेखमालेविरुद्ध पार्नेलने फिर्याद केली नाही तरी, आयरिश पक्षातील एक गृहस्थ ओडोनेल याने टाइम्सवर आपली बदनामी झाल्याची फिर्याद केली. त्यात कैफियत देताना टाइम्सने असे सांगितले की, " ही लेखमाला लिहिताना आमच्या मनात हल्लीचे फिर्यादी मुळीच नव्हते असे आम्ही जाहीर रीतीने सांगावयास तयार आहो." आणि ज्यूरीनेहि असा निकाल दिला की हा फिर्यादी या लेखमालेतील विधाने स्वतःवर ओढून घेत आहे. पण टाइम्सपलाच्या बॅरि स्टराने फिरून भाषण करिताना नसती कुरापत काढून असे म्हटले की, "ओडोनेल यांच्याविरुद्ध आमचे काही म्हणणे नसले तरी, आयरिश पक्षाविरुद्ध आमचे म्हणणे खरेच होते. इतकेच नव्हे तर पार्नेलचे म्हणून जे पत्र प्रसिद्ध झाले ते खरेच आहे." अशा अर्थाचा टाइम्सने काही पुरावाहि दिला. आणि भरीला भर म्हणून पिगटकडून विकत घेतलेली इतर अशीच आणखी काही बनावट पत्रे होती तीहि टाइम्सने छापिली. पूर्वीचे पत्र छापले असता 'पार्नेलने फिर्याद वगैरे काही केले नाही याचा अर्थ पार्नेलचे मन त्याला खात होते आणि बेअब्रूची फिर्याद करण्याची त्याला छाती होत नव्हती' या विचाराने पिगटला आणखी पत्रे बनावट करण्याला व टाइम्सला त्या पत्रांचा उपयोग करण्याला अधिक धैर्य आले होते. एका वर्षांनंतर फिरून तोच बदनामीचा प्रकार सुरू झालेला पाहून, पानें- • लला असे दिसून आले की काही तरी इलाज आपण केलाच पाहिजे. कोणाकडून तरी आपल्या आरोपाची चौकशी करविली पाहिजे. नाही तर टाइम्समधील सर्व पत्रे खरी असाच लोकांचा कायमचा ग्रह होऊन बसेल. म्हणून तारीख ६ जुलै १८८८ रोजी पार्नेलने प्रधान मंडळाला असे सुचविले की, पार्लमेंटच्या सभासदा- वर ज्या अर्थी विशेष प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत, त्या अर्थी पार्लमें- टने एक सिलेक्ट कमिटी नेमून ही चौकशी करावी. पण प्रधान मंडळाने ही गोष्ट नाकारली. तेव्हा ही सूचना स्वतः पुढे आणण्याची नोटिस पार्नेलने दिल्ली. तेव्हा उलट उत्तर म्हणून प्रधान मंडळाने असे सांगितले की, "आम्ही सिलेक्ट कमिटी नेमू इच्छित नाही. पण तीन स्वतंत्र न्यायाधीश चौकशीला नेमण्याला तयार आहो. मात्र ह्या कमिशनपुढे नुसत्या टाइम्समधील पत्रांची चौकशी होईल