पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ णाऱ्या खुनी टोळीच्या पुढा-याशी पार्नेलने खलबते केली. अर्थात् या टोळीच्या चळवळी काय चालल्या आहेत आणि त्यानी कोणाचे खून करण्याचे योजिले याची बातमी पार्नेलला होती. " अशा प्रकारची पत्रे प्रसिद्ध झाल्यावर मग काय विचारता ? ज्याने त्याने पार्नेलवर एवढा डोळा केला. पण 'ज्याला कर नाही त्याला डर कुठली ?' या न्यायाने पार्नेलने ती गोष्ट प्रथम तुच्छता दर्शवून नुसत्या धिःकारावरच घालविली. त्याने दडपशाहीच्या बिलाना विरोध करताना जाहीर रीतीने असे सांगितले की टाइम्समधील पत्र सर्वस्वी बनावट आहे. पण हे त्याचे बोलणे प्रधानमंडळाने उघडपणे त्याला हसूनच निकालात काढले. त्यांच्या हस- ण्याच्या अर्थ असा की "लंडन टाइम्ससारखे अनुभविक कसलेले धंदेवाईक जबाब- दार पत्रकार हे पुरी खात्री करून घेतल्याशिवाय बेअब्रूकारक पत्रे कधीहि छाप-' णार नाहीत. पार्नेल हाच खरा बदमात्र. कारण करून सवरून वरती तो परत निषेधाला तयार. पण त्याने एकवेळ त्यांचा निर्ढावलेला निर्लज्जपणा मात्र प्रगट होतो टाइम्सचे काहीच वाकडे होत नाही. " मुख्य प्रधान लॉर्ड सॅलिस्बरी यानी या पत्रावर विश्वास ठेविला आणि बोलता बोलता ते असेहि वाक्य बोलून गेले की “पार्नेलच्या स्नेह्याच्या स्नेह्यानी बर्कचा खून केला ही गोष्ट आता पार्लमेंटला कळ- लेली आहे." "पार्नेलच्या स्नेह्याच्या स्नेह्यानी' खून केला या शब्दांचा अर्थ अगदी उघडच होता. तो असा की पार्नेलला ह्या खुनाची पक्की माहिती होती. पण लॉर्ड सॅलिवरी हे नुसत्या पार्नेलचा निषेध करून थांबले नव्हते. त्यानी निषेधाचा पेंड खुद्द ग्लॅडस्टनसाहेबांपर्यंत पोचविला. कारण ग्लॅडस्टनसाहेब यानी पार्नेलचा स्नेह संपादिला होता ! पार्नेलचा स्नेही कोणी एक क्ष आणि त्याचा स्नेही बर्कचा खून करणार. अर्थात ग्लॅडस्टन हा खुनी मनुष्याचा एक प्रकारे चुलत भाऊ झाला. " जगाच्या इतिहासात मुख्य प्रधानाच्या जागी असणाऱ्या किंवा येणाऱ्या मुत्सद्याने अशा खुनी मनुष्याच्या स्नेही मनुष्याशी स्नेह ठेविल्याचे उदाहरण क्वचितच सांपडेल!" अशा रीतीने टाइम्समध्ये छापलेल्या पत्राने आपले आगलावे काम केले. पण मग लोक सहजच विचारू लागले की, "पत्र बनावट आहे अशी जर स्वतः पार्नेल याची खात्री होती तर तो अब्रूनुकसानीबद्दल टाइम्सवर एकदम फिर्याद का करीत नाही ?" या प्रश्नाचे उत्तर जॉन मोर्ले यानी दिले आहे ते फार बोधप्रद आहे. ते लिहितात:- :- " पार्नेलने फिर्याद करावयाची तर स्वाभाविकपणे लंडन येथील कोर्टात व लंडन शहरच्या ज्यूरीपुढे. आणि लंडनमधील कोणतेहि १२ लोक घेतले असता ते पार्नेलच्या विरुद्ध निकाल देणार ही गोष्ट एखाद्या पोरानेहि झोपेतून सांगितली असती. इतकी इंग्रज लोकांची मने पार्नेलविरुद्ध झाली होती. बरे लंडनमध्ये फिर्याद न करिता आयर्लंडमध्ये केली तरी तेथेहि टाइम्सपत्र प्रसिद्ध केले जाते. पण तिकडूनहि उलटी अडचण अशी की, कोणत्याहि १२ आयरिश लोकांची ज्यूरी टाइम्सविरुद्ध व पार्नेलच्या तर्फे निकाल देणार ही गोष्ट देखील एखाद्या पोरानेहि तशीच सांगितली असती. इतकी आयरिंश लोकांची मने इंग्रजा-