पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला २७ शेतकरी लोकाना हत्यारे वगैरे पुरवीत असत असे पार्नेल यांस कळल्यावरून त्याने या क्लबाला मिळणारी सर्व वर्गणी बंद करविली व क्लब मोडून टाकविला. तात्पर्य अशा रीतीने एखाद्या पुढाऱ्याला जितक्या गोष्टी अत्याचारा- विरुद्ध खाजगी रीतीने करिता येतील तितक्या त्याने केल्या. पण प्रधानमंडळाचे कैवारी व टाइम्स सारखी पत्रे यांची बडबड चालूच असे की पार्नेल वगैरे लोक हेच अत्याचाराचे खरे उत्पादक होत व त्यांची अत्याचारी लोकाना सहानूभूति व मदत असते. आणि याच अर्थाचीहि लेखमाला सुरू होती. ही संधि साधून पिगट नावाच्या एका साक्षर बदमाषाने पार्नेलच्या सहीची काही बनावट पत्रे तयार केली आणि त्यांची बातमी टाइम्सच्या कानावर घालविली. आपल्या लेखमालेला जोर येण्याला अशा पत्रांचा उपयोग अतिशय होईल, व असल्या एका पत्राने जे काम होईल ते इतर वीस लेखानी होणार नाही किंवा प्रधान मंडळाच्या पार्लमेंटरी निषेधानेहि होणार नाही असे टाइम्सला वाटून, ईषणेला बळी पडून टाइम्सने ती पत्रे फार मोठी किंमत देऊन विकत घेतली. १८८२ प्रमाणे १८८७ साली दडप- शाहीचे काही कायदे पार्लमेंटात घाटत होते. आणि बिलाच्या दुसऱ्या वाचनाचे वेळी आयरिश सभासदांचा विरोध सुरू होता. अशा वेळी टाइम्सने पार्नेलच्या सहीचे म्हणून एक पत्र त्याचा अस्सल छाप बनवून १८ एप्रिल १८८७ च्या अंकात प्रसिद्ध केले, ते पत्र खाली दिल्याप्रमाणे:- १५ एप्रिल १८८२ " वि. वि. तुमच्या स्नेह्याचा मजवर राग झाला असे तुम्ही लिहिता पण त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. पण आम्हाला तरी खुनांचा निषेध करण्या- शिवाय दुसरा कोणता मार्ग मोकळा होता ? याचा तुम्ही व त्यानीहि विचार करा- वयाला पाहिजे, खुनाचा ताबडतोब व स्पष्ट निषेध करणे हेच त्यावेळी आम्हाला योग्य असे धोरण नव्हते काय ? पण तुम्ही कृपा करून त्यानाहि व इतराना कळवा की लॉर्ड कॅव्हेन्डिश यांचा खून झाल्याबद्दल जरी मला फार वाईट वाटते तरी बर्क याचा खून झाल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. कारण त्याला झाले ते शासन योग्यच होते. तुम्ही हे पत्र तुमच्या स्नेह्याना दाखवा. तसेच ज्या इतर कोणाला ते विश्वासाने दाखविता येईल त्यानाहि ते दाखवा. मात्र माझा खाजगी पत्ता त्याना सांगू नका. त्याना पत्र लिहावयाचे तर ते मला त्यानी पार्लमेंटच्या पत्त्या- वर लिहावे. " हें पत्र सहजच खरे वाटण्यासारखे होते. कारण फिनिक्स पार्कमधील खून झाल्यानंतरची तारिख त्यावर होती. पत्रातील मजकूर किती सूचक होता हे वेगळे सांगावयासच नको. आणि तसे ते बनविण्याचे कारण हे की पाचसहा आठ- वड्यापूर्वी टाइम्समध्ये पार्नेल विरुद्ध जो एक लेख आला होता. त्यात असे म्हटले होते की " १८८२ साली ग्लॅडस्टन साहेबानी पार्नेल वगैरेना तुरुंगातून सोडले ही चूक केली. कारण सुटका होताच 'अजिंक्य' हे नाव धारण कर-