पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग ८ असे. आणि हे सिद्ध करण्याकरिता ही लेखमाला सुरू होती. पण शिंतोडे उडवा. वयाचे म्हटले तरी कोरडे शिंतोडे उडविता येत नाहीत. ते ओले असावे लाग- तात. त्याचप्रमाणे पार्नेलवर दोषारोप करावयाचे तर त्याला काही तरी पुरावा पाहिजे एरवी दोषारोप लागू कसा पडणार ? पण वाईट विचार सुचू लागले म्हणजे वाईट साधनेहि सुचू लागतात. तसे याहि ठिकाणी घडले. टाइम्सची लेख- माला जोरात आली आहे असे पाहून, एका कलमबहाद्दर गड्याला अशी कल्पना सुचली की, पार्नेलची खोटी सही घालून काही बनावट पत्रे तयार करावी व ती टाइम्सला विकून पैसे मिळवावे. टाइम्सचे म्हणणे असे होते की पार्नेल गैरे लँडलीगचे लोकच खून वगैरेना उत्तेजन देतात पैसा पुरवतात. अर्थात् बनावट पत्रे करणाऱ्याला हा विषय सोईंचा वाटला. यापूर्वी पाच वर्षे फिनिक्स पार्कमध्ये दोघा इंग्रजी अधिकाऱ्यांचे खून झाले होते. सुमारे एक वर्षांनंतर खुनी लोक सापडले व त्याना शिक्षाहि झाल्या. खून झाल्याची बातमी ऐकून पार्नेलला अति- शय वाईट वाटले. आणि या अत्याचाराचा परिणाम आपल्या या चळवळींवर फार वाईट होईल ही गोष्ट त्याच्या लक्षात आली, 'अशा गोष्टी घडणार असतील तर आपण ही चळवळ टाकून देऊ' असेहि त्याने खासगी व जाहीर रीतीने उद्गार काढले. आणि एका ग्रंथकर्त्याने तर असेहि लिहिले आहे की 'अत्या- चारांच्या निषेधाबद्दल सतत बोललो तर आपला एखादेवेळी खून होईल अशी पार्नेल याला भीति वाटत असे व यामुळे आपल्या खिशात तो पिस्तुलहि बाळगी ! त्याचा निषेध अतिशय तीव्र व कळकळीचा होता व त्याने खुद्द ग्लॅडस्टनला लिहून कळविले होते की " अशा गोष्टी घडतात यामुळे मी राजकारण सोडून द्यावे असा तुमचा सल्ला असला तर मी तसेहि करणार आहे. " पण स्वतः ग्लॅडस्टननेच त्याला उलट असे कळविले की " असे करणे चांगले नव्हे. त्यापासून अत्याचार काही थांबणार नाहीत. पण तुम्ही पुढारीपण सोडल्याने अशा तुमच्या सारख्याचा जो थोडा दाब असतो तो मात्र निघून जाईल.” खुनी लोकांचे जाबजबाब झाले सर्व काही झाले. पण त्यात पार्नेल प्रभृति लोकांचा काही एक संबंध उमटला नाही कारण तो मुळी नव्हताच. या खुनामुळे दडपशाहीचे बिल प्रधान मंडळाकडून पार्लमेंटपुढे आणले गेले. त्याला पार्नेल वगैरेनी अर्थात विरोध केला. आणि १८ सभासदाना अध्यक्षानी 'गैरशिस्त वर्तन करणारे' म्हणून काढून लाविले. या विरोधाच्या वेळी आयर्लंडातील अत्याचारांचे रसभरित वर्णन सरकार- तर्फे करण्यात आले. पण त्यात पार्नेल प्रभृति लोकावर दोषारोप करण्यात आले नव्हते हीहि गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे. इकडे बिलाला विरोध केला पण त्या बरोबर पार्नेलने अत्याचारी लोकाविरुद्ध जाहीर रीतीने निषेध चालविला. स्वतः त्याची बहीण त्याच्याहिपेक्षा अत्यंत जहाल व भावनाप्रधान होती. तिचा व इतर आयरिश बायांचा एक स्त्रीसंघ होता. आणि यातील काही स्त्रिया गुसपणाने