पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ आयर्लंडचा दाखला २५ काराला उभा राही. या तिघांचाहि हेतु एकच म्हणून ते तिघेहि लँड लीगचे सभासद होत. पण त्यांची प्रत्यक्ष कार्ये वेगवेगळ्या स्वरूपाची असत. तथापि पार्लमेंटातील अडवणुकीबद्दल शेतकरी हा जसा जबाबदार नाही किंवा त्याला शिक्षा नाही, त्याच न्यायाने एखाद्या गांजलेल्या शेतकऱ्याने आत्मसंरक्षणासाठी किंवा सूड घेण्यासाठी अत्याचार केला तर त्याकरिता पार्नेल हा जबाबदार धरला जाऊ नये हे न्यायाचेच ठरेल. पण आपल्या प्रतिपक्षाची जबाबदारी वास्तविक असते त्याहून मोठी मानणे करून दाखविणे, नसते दोष किंवा गुन्हे त्याच्या गळी बांधणे, साधली तर त्याला त्याकरिता शिक्षा देऊन निकामी करणे, व ते न साधले तर त्याच्याबद्दल नुसता गवगवा किंवा गैरसमज तरी पिकवून ठेवणे, हे सरकार आपले काम असे समजत असे. पार्नेल व लँड लीग दे विषय अप्रिय व गैर- सोईचे असल्याने ब्रिटिश प्रधानमंडळाचा नेहमी त्याला संकटात आणण्याचा प्रयत्न असे. अशा कामी विशिष्ट वर्तमानपत्रांची मदत प्रधानमंडळाला हिंदुस्थाना- प्रमाणे इंग्लंडातहि होती. लंडन टाइम्स हे विलायतेतील प्रमुख वर्तमानपत्र व ते आयरिश राष्ट्राला व राष्ट्रीय पक्षाला पाण्यात पाहणारे. त्यामुळे त्याने लँड लीगच्या स्थापनेपासून त्यावर हल्ले चढविण्याला सुरवात केली होती. टाइम्सने १८८७ साली आडातील राष्ट्रीयपक्षा विरुद्ध एक लेखमाला सुरू केली. त्या मालेचा मथळा पार्नेलची चळवळ व आयर्लंडातील अत्याचार' असा होता. या मालेमध्ये लँड लीग तिचे पुरस्कर्ते व अनुयायी यांच्या विरुद्ध वाटतील ते खोटे नाटे आरोप करण्यात आले होते. जो खरा झाला असेल तो गुन्हा यांच्या पदरी, झाला नसेल तोहि गुन्हा यांच्या पदरी आणि कोणी तिऱ्हाईताने केला असला तरी त्याच्या पापाचे धनी हेच. टाइम्स म्हणजे अस्सल काँझव्हेंटिव्ह पत्र. इंग्रज जमीनदारांचा तो कट्टा वकील, आणि आयरिश जनतेविषयी त्याच्या मनात पक्का द्वेष. पण कोण- त्याहि जनतेला दोष द्यावयाचा तर तो पुढाऱ्यांच्या नावाने देणे फार सोईचे असते. जनतेचा पुढारीपणा हेच सरकारच्या व सरकारी बगलबच्चांच्या रागाचे सहजच कारण होते. आयर्लंडामध्ये यावेळी अत्याचार होत नव्हते असे नाही. पण त्याचे कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे जुलमी जमीनदारांचा छळ, आयरिश शेतकऱ्याला खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, निजायला अंथरूण नाही, पोरे भुकेने व्याकूळ, गुरे रोडकी, तात्पर्य आयरिश शेतकरी म्हटला म्हणजे तो दुःख व दुर्दशा यांचा मूर्तिमंत पुतळा होऊन राहिलेला. आणि आपल्या या स्थितीला खरे जबा- बदार इंग्रज जमीनदार व त्यांचे पगारी नोकर ही गोष्ट या दुःखी शेतकऱ्याला कळून चुकलेली. यामुळे छळाचे नेहमी जे पर्यवसान होते ते आयर्लंडामध्ये सुरू होते. म्हणूनच मधून मधून अत्याचारहि होत ही गोष्ट खरी. पण आयरिश पुढारी या अत्याचाराचा दोष जसे जमिनदारी पद्धतीवर लादीत होते, त्याच प्रमाणे टाइम्स पत्र या अत्याचारांचा सर्व दोष लँड लीग व पार्नेलची चळवळ यावर लादीत